आगामी निवडणुकीत शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत ‘या’ नेत्याचं मोठं विधान; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे द्वेषाचे नव्हे, तर विकासाचे राजकारण करतात. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी विकासकामांचे जाळे निर्माण केले आहे. विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेच कोरेगावच्या आमदार निवडून येतील. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन करत आमदार निलेश लंके यांनी शिंदेंच्या उमेदवारीबाबत मोठं विधान केले.

खटाव तालुक्यातील जांब येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नुकताच शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यास खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, जितेंद्र पवार, नंदकुमार मोरे, दगडूदादा शिंदे, संदीप मांडवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, विधानसभा आणि लोकसभेसह जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चांगले दिवस येणार आहेत. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला सुरुवात करावी. आ. शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यात वाढावा यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. शिंदे- फडणवीस सरकार मी पाडेन, याची त्यांना भीती वाटत आहे. त्यांच्याकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. माझे घर त्यांनी फोडले आहे. मी मरेपर्यंत शरद पवारांशी निष्ठा ठेवणार आहे.