संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट याना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना केलं जाणार आहे. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संजय शिरसाठ हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर आहे. काल त्यांना सौम्य झटका आला होता. त्यांनतर त्यांना औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटल दाखल मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यास सांगितले.

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून संजय शिरसाट शिंदे गटात सामील झाले. मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यांनतर मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाठ नाराज असल्याची चर्चा होती. अनेक वेळा त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्तही केली होती.