मेट्रो -4 साठी MMRDA विकसित करणार लास्ट माईल कनेक्टिव्हिटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई महानगरातील नागरी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई  मेट्रोची सुविधा  सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबई मेट्रोच्या 3 लाईन्स प्रवाश्यांच्या वापरासाठी  खुल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु या लाईन्स सोबत लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अस्तित्वात येऊ शकली  नाही. त्यामुळे या मेट्रो लाईन्सने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना अडचण  येते. त्यामुळे अनेकदा प्रवासी मेट्रोने प्रवास न करता जुन्या पद्धतीनेच आपला  प्रवास करताना दिसून येत आहे.

MMRDA चा  प्रवाश्यांचा  हितासाठीचा निर्णय :

मुंबई महानगरातील मधील  मेट्रो लाईन 4 काम सध्या जलद गतीने  सुरु आहे. पण सध्या  सेवेत असलेल्या लाईन्स मध्ये प्रवाश्यांना ज्या कारणामुळे  लास्ट माईल कनेक्टिव्हिटी निर्माण होऊ शकली  नाही अश्या कारणांना ओळखून  मेट्रो लाईन -4 संदर्भात  MMRDA ने प्रवाश्यांचा  हितासाठीचा निर्णय घेतला  आहे मेट्रो-4 मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यापूर्वी प्रवाशांसाठी मेट्रो-4 कॉरिडॉरजवळील परिसरात मल्टीमॉडल इंटिग्रेशन ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.MMRDA मार्फत करण्यात येणाऱ्या या  कामावर देखरेख ठेवण्यासाठी एमएमआरडीएकडून विशेष सल्लागार नेमण्यात येणार आहे.

प्रवाश्यांसाठी मेट्रो स्थानकावर  पोहचण्यासाठी सेवा विकसित करणार  :

प्रवाश्यांसाठी मेट्रो स्थानाकावर पोहचण्यासाठी  व स्थानावरून आपल्या घराजवळपर्यंत कनेक्टिव्हिटी सार्वजनिक व्यवस्थेमार्फत सेवा देण्यात येण्यासाठी फीडर सेवा सुरु करण्यात येणार आहेत. त्याचबरोबरीने  मेट्रो स्थानक परिसराजवळ बसस्थानक, ऑटो स्टँड, पदपथ, सायकल ट्रॅक, माहिती फलक आदी सुविधा विकसित करण्याचे नियोजन  करण्यात MMRDA द्वारे करण्यात आले आहे .

मेट्रो-4 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर 2025 पर्यंत सेवा सुरू करण्याची  योजना  :

ठाणे ते मुंबईला जोडणारी मेट्रो-4 सेवा दोन टप्प्यात सुरू होणार आहे.पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोड ते मुलुंड दरम्यान मेट्रो धावणार आहे.मेट्रो-4 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर 2025 पर्यंत सेवा सुरू करण्याच्या योजनेवर MMRDA काम करत आहे.मेट्रो-4 च्या पहिल्या पॅकेजमध्ये 16 स्थानकांवरून सार्वजनिक  वाहतुक सेवा सुरु करण्यात येणार आहे. उर्वरित स्थानाकावर  दुसऱ्या टप्प्यात ही सेवा विकसित  करण्यात येणार आहे.