MGNREGA: कामगारांना मोठा दिलासा! मनरेगा मजुरी दरात तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) 2024-25 साठी अकुशल कामगारांसाठी नवीन मजुरी दर जाहीर केले आहेत. सरकारने आता या दरात राज्यनिहाय 3 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन मजूर दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. याबाबतची माहिती ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने, महाराष्ट्रातील मजुरी दर मनरेगाअंतर्गत (MGNREGA) प्रतिदिन 297 रुपयांपर्यंत वाढविला आहे. ही वाढ गेल्या दोन वर्षांच्या तुलनेने 8.8 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तर, गोव्यामध्ये मजुरीच्या दरामध्ये 10.56 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. परंतु सरकारने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सर्वात कमी वाढ केली आहे. याभागात फक्त 3.04 टक्क्यांनी मजूरी दरात वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे.

मुख्य म्हणजे, 2023-24 वर्षापेक्षा गोव्यात 10.56 टक्क्यांनी म्हणजेच 34 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता चालू वर्षासाठी मजुरी दर 356 रुपये इतका असणार आहे. यापूर्वी गोव्यातील मजुरी दर 322 रूपये इतका होता. सध्या देशातील मजुरी दर हा प्रतिदिन 267.32 इतका आहे. परंतु आता मजुरी दर वाढविल्यामुळे तो 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 285.47 इतका झाला आहे. यापूर्वी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ग्रामीण विकास मंत्रालयाने मजुरी दर अधिसूचित करण्याची आयोगाकडे परवानगी मागितली होती. (MGNREGA) आयोगाने ही परवानगी दिल्यानंतरच अधिसूचना जारी करण्यात आली आहे.