मातोश्री 2 कशी उभी राहिली? मनसे नेत्याचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वरून कालच्या सभेत प्रश्नचिन्ह उभे केले. यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. मातोश्री 2 कशी उभी राहिली, हे सुषमा अंधारेंनी स्पष्ट करावं. माझे नेते राज ठाकरे हे शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे नाही. याउलट मातोश्री 2 कशावर झालंय?, 126 कोटी बापाचे आणि 11 कोटी मुलाचे कुठून आले? हे काय धंदा करत होते? असा सवाल महाजन यांनी केला आहे.

प्रकाश महाजन यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुषमा अंधारे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली. महाजन म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी विचार करून बोलावे. त्यांच्या मालकाला विचारून बोलावे. माझे नेते शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. सगळे कर भरतात. टोपल्याखाली झाकून काही करत नाहीत.

मला अंधारेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत की, मातोश्री 2 कशावर झालंय. 126 कोटी बापाचे आणि 11 कोटी मुलाचे कुठून आले? हे काय धंदा करत होते? काय करत होते? कशाला बोलताय? असा सवाल महाजन यांनी केला.

मातोश्री 2 प्रकरण काय?

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्य निवासस्थान मुंबईत वांद्रे येथील कलानगर येथे मातोश्री बंगल्यात आहे. याच मातोश्रीवरून शिवसेना पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. 2019 मध्ये या इमारतीशेजारीच आठ मजली मातोश्री 2 ही इमारत बांधण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याच वर्षी ही इमारत उभी राहिली.