Saturday, March 25, 2023

युती की आघाडी?? राज ठाकरेंचा मोठा निर्णय; मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोणाससोबतच युती किंवा आघाडी न करता आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढू असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज मुंबईतील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

आगामी सर्व महानगरपालिका निवडणुका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही कामाला लागा. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी, असे राज ठाकरे म्हणाले. सत्ता आली तर मी तुम्हांलाच सत्तेत बसवेन मी सत्तेत बसणार नाही असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला.

- Advertisement -

दरम्यान, सध्या राज्यात जे काही राजकारण चालले आहे त्याला जनता कंटाळली आहे. अनेक लोकांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पहिला सुद्धा नाही. त्यामुळे सध्या लोकांमध्ये मनसेबाबत सकारात्मक भूमिका आहे. तुम्ही फक्त कामाला लागा, तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी असे म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांना ऊर्जा दिली.