हातात मोबाईल घेताच झाला ब्लास्ट, भयंकर दुर्घटनेचा Video आला समोर

Mobile Blast
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मोबाईल ब्लास्ट (Mobile Blast) झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पहिली किंवा ऐकली असतील. सध्या अशाच एका मोबाईल ब्लास्टचा (Mobile Blast) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाच्या हातातच मोबाईलाच ब्लास्ट (Mobile Blast) झाला आहे. ही भयंकर दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मोबाईल रिपेअरिंगच्या एका दुकानात हि दुर्घटना घडली आहे.

काय घडले नेमके ?
दुकानातील तरुण मोबाईलची बॅटरी काढण्याचा प्रत्न करत होता त्यावेळी अचानक मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) झाला आणि मोबाईलमधून निघालेली आग दुकानाच्या काऊंटरवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या तोंडावर बसली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण मोबाईलच्या दुकानात आहे. एक व्यक्ती त्या दुकानात येतं. दोघंही आपसात बोलत असतात. त्यावेळी तरुण दुकानातील एक मोबाईल हातात घेतो आणि त्याची बॅटरी काढायला जातो. मोबाईलच्या मागील कव्हर उघडण्याचा तो प्रयत्न करत असतो तोच मोबाईलचा अचानक ब्लास्ट (Mobile Blast) होतो.

ही आग समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या तोंडावर बसते. ती व्यक्ती तशी जीव मुठीत धरून दुकानातून बाहेर पळते. तर तरुणही ब्लास्ट (Mobile Blast) होताच हातातील मोबाईल फेकून देतो. सुदैवाने त्याला काही झालं नाही आणि आग लगेच विझवल्याने मोठी (Mobile Blast) दुर्घटनाही टळली. ही घटना मध्य प्रदेशच्या कनकी या ठिकाणी घडली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर