मोबाईल चार्जिंग करताना स्फोट!! 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्वाचा भाग ठरत आहेत. आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईलची गरज सुद्धा आहे, मात्र मोबाईल वापरत असताना काही काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावं लागते. अशीच एक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मोबाईल चार्जिंग करताना अचानक स्फोट (Mobile Blast) होऊन यामध्ये ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मुलांचे आई वडील सुद्धा गंभीररीत्या भाजले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुझफ्फरनगर येथील जॉनीनावाच्या व्यतीच्या घरात मोबाईलचा हा भीषण स्फोट झाला. होळीनिमित्त जॉनी आणि त्याच्या कुटुंबातील सर्वच जण घरीच होते. त्याची पत्नी बबिता स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. मुलगी सारिका (10), निहारिका (8), मुलगा गोलू (6) आणि कालू (5) खोलीत होते. त्याचवेळी रूमच्या बोर्डवर मोबाईल चार्जिंगला लावला होता, मात्र चार्जरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या बाहेर आल्या. त्यामुळे बेडवर पसरलेल्या गादीला आग लागली. आगीने वेढलेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न जॉनी आणि बबिता यांनी केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. घबराटीचा आवाज ऐकून जॉनीचे शेजारी धावतपळत आले, आणि सर्वाना घराबाहेर काढलं. आणि तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चारही मुलांचा मृत्यू झाला.