Mobile Delivery By Drone : आता ड्रोनद्वारे होणार मोबाईल डिलिव्हरी; Amazon ची नवी सर्व्हिस सुरु

mobile delivery by drone
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mobile Delivery By Drone : Amazon हि जगातील सर्वात आघाडीची इ कॉमर्स कंपनी आहे. कोणतीही वस्तू ऑनलाईन खरेदी करायची असेल तर आपण सर्वात आधी ऍमेझॉनला प्राधान्य देतो. कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांना वेळेत आणि सुरक्षित वस्तू पुरवण्याकडे कायम भर देत असते. आताही ऍमेझॉनने आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी नवीन आयडियाची कल्पना आणली आहे. आता ड्रोनद्वारे मोबाईल डिलिव्हरी करण्याचा उपक्रम ऍमेझॉनने सुरु केला आहे. अमेझॉन त्यांच्या नवीन MK30 ड्रोनचा वापर करून ही डिलिव्हरी करणार आहे. जेव्हा हे ड्रोन डिलिव्हरी पॉईंटवर पोहोचतील, तेव्हा ते डिलिव्हरी करण्यापूर्वी योग्य स्थान आणि योग्य पॅकेजची पडताळणी करतील. विशेष म्हणजे असा दावा केला जातो की ही डिलिव्हरी ६० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळात केली जाईल.

ड्रोनद्वारे मोबाईल डिलिव्हरी करण्याचा उपक्रम (Mobile Delivery By Drone) ऍमेझॉनने भारतात नव्हे तर अमेरिकेत सुरु केला आहे. भारतात ड्रोनच्या माध्यमातून मोबाईल डिलिव्हरी कधी होईल हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. परंतु सध्या अमेरिकेत मात्र ड्रोनच्या माध्यमातून आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, अ‍ॅपल एअरटॅग, एअरपॉड्स, रिंग डोअरबेल सारखे गॅझेट ऍमेझॉन घरोघरी पोहोचवत आहे. ड्रोनद्वारे वस्तू पोहोचवण्याचा ट्रेंड इतका वाढला आहे की एकट्या अमेरिकेतच Amazon 60 हजारांहून अधिक वस्तू पोहोचवू शकते.

वजन पाच पौंड किंवा त्यापेक्षा कमी असावे- Mobile Delivery By Drone

याबाबत Amazon ने सांगितले आहे की चेक आउट करताना तुम्हाला ड्रोन डिलिव्हरी पर्याय निवडावा लागेल. तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू एखाद्या पात्र क्षेत्रातून खरेदी करत असाल आणि त्या वस्तूचे वजन पाच पौंड किंवा त्यापेक्षा कमी असावे. त्यानंतर तुम्ही तुमचा डिलिव्हरी पत्ता आणि तुमच्या पत्त्यावर डिलिव्हरी स्पॉट निवडू शकता, जसे की तुमचा ड्राइव्हवे किंवा यार्ड. ड्रोनद्वारे डिलिव्हरीसाठी, ग्राहकाला $४.९९ अतिरिक्त द्यावे लागतील. भारतीय चलनानुसार, ही रक्कम सुमारे ४३० रुपये होते. एका अहवालानुसार, कंपनी ६० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळेत डिलिव्हरी देण्याचा दावा करते. ही सुविधा सध्या तरी अमेरिकेतील काही निवडक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे की ड्रोन पत्त्यावर पोहोचण्यासाठी आणि पार्सल सोडण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगू शकते. तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, Amazon अंदाजे डिलिव्हरी विंडो देते. जर डिलिव्हरी पूर्ण झाली नाही, तर ती का झाली नाही याचे कारणही Amazon कडून सांगण्यात येईल.