Mobile Forensic Van: आता गुन्हेगारीला बसणार आळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

0
3
Mobile Forensic Van
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mobile Forensic Van – गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असून, यावर उपाय म्हणून महाराष्ट्राने अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सची सेवा सुरू केली आहे. फॉरेन्सिक व्हॅन्सची सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे लोकार्पण करून गुन्हे तपासात मोठा बदल होईल, असे सांगितले आहे. या व्हॅन्समुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे. तर चला जाणून घेउयात याबद्दल सविस्तर माहिती .

गुन्हे उघडकीस आणण्यास मदत (Mobile Forensic Van)-

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचा मुख्य उद्देश म्हणजे गुन्ह्यातील पुरावे नष्ट होऊ नयेत किंवा त्यांच्यात छेडछाड होऊ नये. यामुळे गुन्हेगारांना सुटण्याची शक्यता कमी होईल आणि पुराव्यांचे संरक्षण अधिक सुरक्षिक होईल. याचबरोबर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढेल, तसेच आरोपींना न्याय मिळवून देण्यास मदत होईल.

फॉरेन्सिक व्हॅन्स (Mobile Forensic Van)

महाराष्ट्र राज्याने भारतीय साक्ष्य अधिनियमाच्या अंमलबजावणी संदर्भात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार केली आहेत, ज्यामध्ये वैज्ञानिक व केमिकल तज्ज्ञ असतील. या व्हॅन्समुळे घटनास्थळीच रक्ताचे नमुने, नार्कोटिक्स, स्फोटकांचे नमुने आणि अन्य महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले जाऊ शकतात. व्हॅन्समध्ये असलेली वैज्ञानिक उपकरणे आणि किट्स घटनास्थळीच प्राथमिक व अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी वापरता येतील. तसेच प्रत्येक व्हॅनमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर पुराव्यांचे संरक्षण करण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे छेडछाड होणे रोखता येईल. तसेच, प्रत्येक व्हॅनमध्ये सीसीटीव्ही आणि फ्रिजसुद्धा असतील, जेणेकरून तपासणीसाठी वापरलेले केमिकल्स आणि पुरावे योग्य तापमानावर ठेवले जाऊ शकतील.

भविष्यात 256 व्हॅन्स तयार –

सध्या 21 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स (Mobile Forensic Van) तयार करण्यात आले असून, भविष्यात 256 व्हॅन्स तयार करून राज्यभरात उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळे गुन्हे तपासण्यात महत्त्वपूर्ण सुधारणा होईल, आणि राज्यातील न्याय व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल. या नव्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात गुन्हे सिद्ध होण्याचा दर वाढणार आहे.

हे पण वाचा : सिंधुदुर्गला जाणारं विमान थेट गोव्यात उतरले ; नेमकं काय घडलं जाणून घ्या

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज