फक्त 16 रुपयांत मिळतोय मोबाईल; पहा कुठे आहे ऑफर?

LAVA AGNI 3 OFFER
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फक्त १६ रुपयांत मोबाईल खरेदी करण्याची संधी? तो पण अँड्रॉइड मोबाईल? वाचून नक्कीच धक्का बसला ना…. पण हे खरं आहे. भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा इंटरनॅशनल लिमिटेड आपली १६ वर्षे पूर्ण करत आहे आणि या निमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हि खास ऑफर आणली आहे. उद्या रविवार ३० मार्च रोजी लावा अॅनिव्हर्सरी सेल सुरु होणार आहे. कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर वर तसेच Amazon, Flipkart सारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म वर हा सेल तुम्ही बघू शकता. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला अगदी स्वस्तात मोबाईल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

लावा अॅनिव्हर्सरी सेलच्या माध्यमातून कंपनी त्यांचा फ्लॅगशिप AGNI 3 स्मार्टफोन फक्त १६ रुपयांना विकणार आहे. या मोबाईलची खास बाब म्हणजे यामध्ये २ डिस्प्ले देण्यात आले आहेत. AGNI 3 स्मार्टफोन शिवाय LAVA प्रोवॉच व्ही१ स्मार्टवॉच सुद्धा फक्त १६ रुपयांना विकणार आहे. खरं तर हि ऑफर खूपच आकर्षित आहे. कारण इतक्या कमी किमतीत स्मार्टफोन मिळणे आजकाल शक्यच नाही. मात्र ही ऑफर फक्त पहिल्या १०० ग्राहकांसाठी लागू असेल. ते कूपन कोड वापरून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

LAVA AGNI 3 स्मार्टफोनची विक्री ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. तर Prowatch V1 स्मार्टवॉचची विक्री संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. हे दोन्ही मोबाईल आणि स्मार्टवॉच फक्त १६ रुपयांना विकली जातील. ही ऑफर मर्यादित काळासाठी असल्याने, फक्त पहिल्या १०० खरेदीदारांनाच ही संधी मिळेल. जर तुम्ही पहिल्या १०० खरेदीदारांमध्ये सामील झालात, तर तुम्ही १६ रुपयांना स्मार्टफोन आणि १६ रुपयांना स्मार्टवॉच खरेदी करू शकाल.

LAVA AGNI 3 स्मार्टफोनचे फीचर्स –

LAVA AGNI 3 स्मार्टफोन १९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. या मोबाईल मध्ये २ डिस्प्ले मिळतात. यातील मुख्य डिस्प्ले ६.७८ इंच आहे, तर दुसरा डिस्प्ले 1.74 इंचाचा आहे. मोबाईल मध्ये मीडियाटेक डाइमेंशिटी 7300X 4nm प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन एंड्रॉयड 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईलच्या कॅमेरा सेटअपच्या बाबतीत सांगायच झाल्यास, यात ५०-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, ८-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ८-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे जी ६६W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.