Mobile Internet Saving Tips : मोबाईलचं नेट लगेच संपतंय? मग आत्ताच बदला ‘या’ सेटिंग्स

Mobile Internet Saving Tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mobile Internet Saving Tips आजकाल मोबाईल म्हणजे आपला जीव कि प्राण… एकवेळ तुम्ही जेवण करायचं विसराल, परंतु मोबाईल हातात घेतल्याशिवाय राहणार नाही…. मोबाईलचे वेड आता व्यसनात बदलत आहे, आणि त्यातील इंटरनेट म्हणजे मोबाईलचा जणू आत्माच…. जसे पंख्याशिवाय पक्षी काहीच करू शकत नाही, त्याचप्रमाणे इंटरनेट शिवाय मोबाईलला किंमत नाही… म्हणूनच कि काय मोबाईलचे रिचार्ज कितीही महाग झाले तरी इंटरनेटच्या वापरासाठी आपण पैसे खर्च करतोच. सध्याच्या महागाईच्या काळात अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, तर हे करत असताना दुसरीकडे इंटरनेट डेटा प्लॅन मात्र कमी केला आहे. त्यामुळे अनेकांना इंटरनेटची बचत करत करत वापर करावा लागतोय. अनेक वापरकर्त्यांची समस्या तर हीच असते कि त्यांचे नेट खटाखट उडते.. अशावेळी नेमकं काय करायचं? कोणती ट्रिक वापरून इंटरनेटची बचत करायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) डेटा सेव्हर मोड चालू करा-

सर्वात आधी तुमच्या मोबाईल सेटिंग्जमध्ये डेटा सेव्हर मोड सुरू करा. यामुळे बॅकग्राउंड डेटा वापर कमी होईल आणि तुमचा डेटा फक्त गरजेच्या ॲप्ससाठी वापरला जाईल. इतर कुठेही विनाकारण तो खर्च होणार नाही.

२) ऑटो अपडेट्स बंद करा- Mobile Internet Saving Tips

अनेकदा जेव्हा तुम्ही इंटरनेट डेटा सुरु करता तेव्हा अँड्रॉइड आणि आयफोनमधील अॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम ऑटोमॅटिक अपडेट होतात. यामुळे तुमची गरज नसतानाही फुकटचे नेट वाया जाते. त्यामुळे हे ऑटो अपडेट्स बंद करणे गरजेचं असते. यासाठी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जावा. अॅप्स आणि सिस्टम अपडेट्स फक्त वायफायवर सेट करा. यामुळे तुमचे दररोजचे इंटरनेट वाचेल आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाचे वायफाय वापराल तेव्हाच ते अँप्स अपडेट होत राहतील.

३) WhatsApp डाउनलोड थांबवा-

कधी कधी तुमच्या WhatsApp वर येणारे फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होतात… हे फोटो कधी आणि कसे आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात हे तुम्हाला माहितीही पडत नाही. परिणामी तुमचा इंटरनेट डेटा अनावश्यक्य संपतो. अशावेळी व्हाट्सअप सेटिंग मध्ये जावा… आणि ऑटो डाउनलोड बंद करा (Mobile Internet Saving Tips) . गरज असेल तेव्हाच फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करा.

४) व्हिडिओ लो क्वालिटी बघा –

तुमच्यापैकी अनेकजण युट्युब किंवा इतर प्लॅटफॉर्म वरून विडिओ बघत असतील. विडिओ बघत बसल्याने तर सर्वात जास्त इंटरनेट जाते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही युट्युब वर विडिओ बघाल तेव्हा त्याची क्वालिटी अतिशय लो ठेवा.. म्हणजे तुम्ही कितीही वेळ विडिओ बघितला तरी इंटरनेटची बचत होऊ शकते. तर मित्रानो, या सोप्या पद्धतींनी तुम्ही तुमच्या इंटरनेटची बचत करू शकता.