हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी आता जास्त वेळ लागणार नाही… तुम्ही एखादा मोबाईल खरेदी केल्यास फक्त १० मिनिटात तुम्हाला तो घरपोच मिळणार आहे… ऐकायला अविश्वनीय वाटतं असलं तरी हे खरं आहे. Swiggy Instamart ने याबाबत घोषणा करत अवघ्या १० मिनिटात घरपोच मोबाईल डिलिव्हरी देण्याचं जाहीर केलं आहे. Swiggy Instamart च्या या घोषणेनंतर amazon, ब्लिंकिंट सारख्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
एका प्रेस रिलीजमध्ये, स्विगी इन्स्टामार्टने 10 मिनिटात घरपोच मोबाईल डिलिव्हरीची घोषणा केली आहे. सध्या देशातील १० शहरांमध्ये हि सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये बंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, फरीदाबाद, नोएडा, गुरुग्राम, कोलकाता, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या शहरांचा समावेश आहे. Swiggy Instamart वरून Apple, Samsung, OnePlus आणि Redmi सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन या शहरात ग्राहकांना फक्त १० मिनिटात मिळतील. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचण्यास मदत होईल. सध्या फक्त १० शहरांमध्ये हि सेवा सुरु असली तरी भविष्यात देशातील इतर महत्वाच्या भागात सुद्धा कंपनी आपली सर्व्हिस सुरु करेल. स्विगी इन्स्टामार्टवर स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही खास बँक ऑफर्सचा लाभ सुद्धा मिळणार आहे. तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५% डिस्कॉऊंट मिळेल. ही सवलत ११,४९९ रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोन ऑर्डरवर लागू असेल.
स्विगी इन्स्टामार्टने अलीकडेच १०० शहरांमध्ये आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. यामध्ये २०२५ मध्ये ३२ नवीन शहरे जोडली गेली आहेत. आता, हा प्लॅटफॉर्म फक्त किराणा सामानच नाही तर स्मार्टफोनसारख्या हाय डिमांड असलेल्या उत्पादनांची देखील सुपर-फास्ट डिलिव्हरी देत आहे. स्विगी इन्स्टामार्टचे ब्लिंकिंट आणि झेप्टो सारखे प्रतिस्पर्धी आधीच काही स्मार्टफोनची जलद डिलिव्हरी देत आहेत. आता स्विगी इन्स्टामार्टने यात उडी घेतल्याने इतर कंपन्यांसाठी हि धोक्याची घंटा मानली जातेय.