Mobile Recharge Hike : मोबाईल रिचार्ज महागणार!! केव्हापासून आणि किती रुपयांनी वाढणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मोबाईल हा गरजेचा आणि जीवनावश्यक गोष्ट बनला आहे, मोबाईल म्हंटल कि त्याला रिचार्ज हा आलाच …. त्यामुळे हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण एअरटेल, जिओ आणि वोडाफोन- आयडियाच्या रिचार्ज आता महागणार आहे.. या तिन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये भली मोठी वाढ (Mobile Recharge Hike) करणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या उन्हाळ्याचा सीजन असून उष्णतेच्या लाटेमुळे दूरसंचार कंपन्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळेच रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात.

उष्णतेच्या लाटेमुळे दूरसंचार कंपन्यांचा खर्च वाढला आहे. यावेळी बेस स्टेशन सतत चालू ठेवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना एअर कंडिशनिंगचा (AC) जास्त वापर करावा लागत आहे. वापर जास्त असल्याने त्याला अतिरिक्त खर्च सुद्धा येत आहे. हाच खर्च भरून काढण्यासाठी जून महिन्यापासून मोबाईल रिचार्जच्या किमती वाढण्याची (Mobile Recharge Hike) शक्यता आहे. आधीच महागाईची झळ सर्वसामान्य जनतेला सोसावी लागत आहे. त्यातच आता अतिमहत्त्वाचा असल्लेया मोबाईल रिचार्ज सुद्धा वाढला तर ग्राहकांना आणखी आर्थिक फटका बसणार आहे.

रिचार्जच्या दरात किती वाढ होईल ? Mobile Recharge Hike

मीडिया रिपोर्टनुसार, जूनपर्यंत रिचार्ज प्लॅनच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. कारण उन्हाळ्यात कंपन्यांची ऑपरेटिंग सुमारे 20 ते 24 टक्क्यांनी वाढला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने डिझेल जनसेट चालू असल्याने ऑपरेशनचा खर्च वाढला आहे. हा सर्व खर्च टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांकडूनच वसूल करणार . त्यामुळे जून महिन्यापासून मोबाईल रिचार्ज महागणार असल्याच्या चर्चा आहेत.