Mobile Recharge Hike : मोबाईल रिचार्ज महागणार!! सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका

Mobile Recharge Hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mobile Recharge Hike मोबाईल आणि त्यासाठी लागणारा रिचार्ज हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. परंतु आता हाच अविभाज्य भाग तुमचा खिसा मोकळा करणार आहे. येत्या काळात मोबाईल रिचार्जच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास १० ते १२ टक्क्यांनी रिचार्ज महाग होणार आहेत. मे महिन्यात सक्रिय मोबाइल वापरकर्त्यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ हे या रिचार्ज दरवाढीचे कारण असल्याचं बोललं जातंय. या रिचार्ज दरवाढीचा फटका देशातील सर्वसामान्य ग्राहकांना बसणार हे नक्की.

मे महिन्यात मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांना विश्वास मिळाला आहे की ग्राहक आता महागडे प्लॅन देखील घेऊ शकतात. त्यामुळेच कंपन्या रिचार्ज प्लॅन वाढवण्याची तयारी (Mobile Recharge Hike) करत आहेत. परंतु यावेळी ते फक्त बेस प्लॅनपुरते मर्यादित राहणार नाही. गेल्या वेळी जुलै २०२४ मध्ये किमती वाढवल्या गेल्या होत्या, तेव्हा बेसिक प्लॅनमध्ये ११-२३% वाढ झाली होती. यावेळी कंपन्या मध्यमवर्गीय आणि उच्च श्रेणीच्या वापरकर्त्यांना लक्ष्य करतील, जेणेकरून जास्तीत जास्त महसूल वाढवता येईल

मे महिन्यात किती यूजर्स वाढले – Mobile Recharge Hike

मे महिन्यात सक्रिय मोबाईल युजर्सच्या संख्येत मोठी वाढ (Mobile Recharge Hike_ झाली आहे. हे वाढते ग्राहक पाहून कंपन्या या वर्षाच्या अखेरीपर्यंत पुन्हा एकदा रिचार्जचे दर वाढविण्याचा विचार करत आहेत. मे महिन्यात ७.४ दशलक्ष म्हणजेच ७४ लाख सक्रिय वापरकर्ते वाढले आहेत. मागील २९ महिन्यांतील हे सार्वधिक ग्राहक आहेत. यापूर्वी, जुलै ते नोव्हेंबर या काळात २.१ कोटी वापरकर्ते कमी झाले होते, परंतु आता सलग पाच महिने मोबाईलसिम कार्ड वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त यूजर्स जिओ ने जोडले आहेत. तर एअरटेलने १३ लाख नवीन सक्रिय यूजर्स जोडले.

दुसरीकडे, इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपन्या आणखी एक रणनीती आखण्याचा प्लॅन करत आहे. त्यानुसार, कंपन्यांचा विचार त्यांच्या प्लॅनमध्ये ‘टायर्ड प्राइसिंग’ लागू करण्याचा आहे. याचा अर्थ असा की सध्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाची मर्यादा कमी केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, ग्राहकांना पुन्हा पुन्हा डेटा पॅक रिचार्ज करावा लागू शकतो. सध्या लहान आणि स्वस्त डेटा पॅक देखील आणत आहेत जेणेकरून ग्राहक डेटा पॅकवर अधिक अवलंबून राहतील आणि भविष्यात, हे डेटा पॅक महाग (Mobile Recharge Hike) करून, कंपन्या अधिक पैसे छापू शकतील असेही बोललं जातंय.