Mobile Scam : मोबाईल मधील ‘हे’ सेटिंग्ज बंद करा, अन्यथा बँक खातं होईल रिकामं

Mobile Scam Alert
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mobile Scam । मोबाईल हा आजकाल जीवनावश्यक बनला आहे. मोबाईलशिवाय आजकाल आपलं पानही हलत नाही. मोबाईलमुळे आपली अनेक काम घरबसल्या होतात. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. परंतु एकीकडे मोबाईलचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे काही समाजकंठकांकडून मोबाईलचा दुरुपयोग सुद्धा गेला जात आहे. मोबाईलच्या माध्यमातून सायबर क्राईमचे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे त्याबाबत आपण सुरक्षा बाळगणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मोबाईल मधील अशा काही सेटिंग बाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही तात्काळ बंद करायला हव्यात अन्यथा तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकते.

लोकेशनबाबत रहा सावध – Mobile Scam

मोबाईल मधील लोकेशन सेटिंगबाबत तुम्ही जागरूक राहायला हवं. कारण लोकेशनच्या मदतीने समोरच्या ॲपला इतर अनेक माहिती मिळते. त्यामुळे, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचे लोकेशन लॉक केलेले राहील आणि कोणीही त्याचा वापर करू शकणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच जेव्हा तुम्हाला एखाद्या अँप साठी लोकेशन परवानगी द्यावी लागेल त्यापूर्वी सदर अँप्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

तुम्ही ॲप ट्रॅकर्सबद्दल सुद्धा सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. काही वेळा इतर ॲप तुम्हाला इतर ॲप्स वापरण्याची परवानगी विचारते. परंतु यामधून सुद्धा तुमच्याशी धोका होऊ शकतो. त्यामुळे ही परवानगी देण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कारण हा ॲक्सेस दिल्याचा अर्थ असा होतो की तो इतर ॲप्सचा डेटाही गोळा करू शकतो. याशिवाय हे ॲप तुमच्या सोयीनुसार सेट करून तुमच्या दिवसभरातील हालचालींवर लक्ष ठेवते. म्हणजेच तुम्ही प्रत्येक ॲपला ॲप ट्रॅकरची परवानगी देऊ नये. याशिवाय, स्कॅमर (Mobile Scam) बर्याच काळापासून VPN ॲप्स वापरत आहेत. हे ॲप्स वापरकर्त्यांचा संपूर्ण मोबाईल हॅक करू शकतात. त्यामुळे VPN ॲप्स वापरण्यापूर्वी तुम्ही विचार केला पाहिजे.