हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धावपळ चाललेली दिसत आहे. राजकीय वर्तुळात रोजच नवनवीन गोष्टी घडत आहेत. भारतामध्ये 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. परंतु आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता निवडणुकीमध्येच मोबाईल रिचार्ज (Mobile Telicom Company ) महागणार आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार मोबाईल कंपन्या (Mobile Telicom Company ) दर वाढवणार आहेत. त्याचा ग्राहकांना चांगला आर्थिक फटका बसणार आहे. टेलिकॉम कंपन्या 15 ते 17 टक्क्यांनी रिचार्ज दर वाढवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. याचा मोबाईल कंपन्यांना चांगला नफा होणार असला, ग्राहकांना मात्र याचा तोटा होणार आहे. टेलिकॉम कंपन्या या मागील बऱ्याच काळापासून रिचार्ज दरवाढ करण्याच्या तयारीत होते. मात्र यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर टेलिकॉम कंपन्या रिचार्ज वाढ करणार असल्याच्या गोष्टीवर ठाम निर्णय घेतलेला आहे.
15 ते 17 टक्क्यांनी होणार रिचार्ज दरवाढ | Mobile Telicom Company
टेलिकॉम कंपन्यांनी 3 वर्षांपूर्वीच म्हणजेच डिसेंबर 2021 मध्ये मोबाईल रिचार्जमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ केली होती. आता तीन वर्षांनी 15 ते 17 टक्क्यांनी दरवाढ करण्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता 350 रुपयांना येणाऱ्या रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला 450 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजेच 50 रुपयांनी रिचार्ज महागणार आहे. या निर्णयाचा सगळ्यात जास्त फायदा एअरटेल या कंपनीला होणार आहे. गेल्या काही दिवसात वोडाफोन आणि आयडिया या कंपनीला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. 2023 मध्ये दोन्ही कंपन्यांना होणारा फायदा हा 37% वरून 19.3% वर आलेला आहे.
जीओची खास ऑफर
रिलायन्स जिओ ही सध्या अनेकांच्या आवडीची टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी येत्या दिवसांमध्ये 895 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन घेऊन येत आहे. 365 दिवसांच्या प्लॅनमध्ये 24 जीबी डेटा असणार आहे. त्याचप्रमाणे 28 दिवसापर्यंत 2 जीबी हायस्पीड डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 एसेमेस फ्री असणार आहे. त्यामुळे हा वर्षभराचा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे भारतामध्ये सध्या जिओचे युजर्स जास्त आहे.