Mobiles Under 15000 : 15 हजारांपेक्षा कमी पैशात खरेदी करा ‘हे’ 3 मोबाईल

Mobiles Under 15000
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mobiles Under 15000 । आजकाल प्रत्येकाला नवनवीन मोबाईल खरेदी करू वाटतो. बाजारात सुद्धा सतत अपडेटेड फीचर्स सह आकर्षक मोबाईल लाँच होत असतात. परंतु मोबाईल खरेदी करत असताना कमी पैशात आणि जास्तीत जास्त फीचर्सने सुसज्ज असलेल्या मोबाईल कडे सर्वांचा ओढा असतो. तुम्ही सुद्धा कमी पैशात म्हणजेच १५ हजार रुपयांच्या आसपास (Mobiles Under 15000) मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला असे ५ स्मार्टफोन दाखवणार आहोत जो तुम्ही अगदी कमी खर्चात विकत घेऊ शकता. तसेच या मोबाईल मध्ये तुम्हाला खास फीचर्स सुद्धा मिळतील. हे मोबाईल कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात….

१) Poco M7 Pro 5G-

Poco M7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सह 6.67-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०२५ अल्ट्रा चिपसेट वापरली असून ग्राहकांना ८ जीबी पर्यंत रॅम मिळते. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, Poco M7 Pro 5G मध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, आणि २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. मोबाईल मध्ये 5110mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco M7 Pro 5G हा मोबाईल ग्राहकांना 13,999 रुपयांत उपलब्ध आहे.

2) Redmi 13 5G– Mobiles Under 15000

Redmi 13 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1000 निट्स ब्राइटनेस आणि
कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळतेय. कंपनीने या मोबाईल मध्ये Mediatek Dimensity 6080 चिपसेट बसवली असून हा 12GB रॅम या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, मोबाईलमध्ये ट्रिपल रियर कैमरा सेटअप आहे, ज्यामध्ये 108MP प्राइमरी सेंसर आणि समोरील बाजूला 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 5030 mAh बॅटरी बसवण्यात आली असून ती 33W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. मार्केट मध्ये Redmi 13 5G ची किंमत 12,498 रुपये आहे.

3) Realme P3x 5G –

Realme P3x 5G स्मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत स्टायलिश आणि शक्तिशाली कामगिरी देतो. या बजेट फ्रेंडली फोनमध्ये १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७२-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सैंपलिंग रेट मिळतो. कंपनीने मोबाईल मध्य मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 प्रोसेसर बसवला असून यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळतेय. रिअलमीच्या या स्मार्टफोन मध्ये 6,000mAh ची मजबूत बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी मिळतोय. मार्केट मध्ये Realme P3x 5G ची किंमत 13,999 रुपये आहे.