Mobiles Under 15000 : 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ Mobile

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mobiles Under 15000 : मोबाईल हि आजकाल जीवनावश्यक वस्तू बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईल च्या माध्यमातून आपण अनेक कामेही घरबसल्या करू शकतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात मोबाईलचे महत्व मोठं आहे. हेच महत्व लक्षात घेऊन अनेक मोबाईल निर्माता कंपन्या बाजारात अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल आणत असते. परंतु ग्राहकवर्ग मात्र कमी किमतीत जास्त फीचर्स देणारा, स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. तुम्ही सुद्धा नवा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला १५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणारे काही मोबाईल बद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

LAVA Storm 5G-

LAVA Storm 5G या मोबाईल मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर दिला असून हा मोबाईल यामध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज दिले आहे. मोबाईल मध्ये पाठीमागील बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड अँगल देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 13,499 रुपये आहे.

Moto G34 5G- Mobiles Under 15000

Moto G34 5G मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश सह 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे या डिस्प्लेला 1080×2400 पिक्सेल रोझोल्युशन मिळतंय. स्मार्टफोनमध्ये 2.4 GHz Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे तर समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. हा मोबाईल 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियन्ट मध्ये आला असून त्याची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु (Mobiles Under 15000) होते.

Vivo Y28 5G –

Vivo Y28 5G मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा HD+ हाय ब्राइटनेस डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6020 चिपसेट बसवली असून हा स्मार्टफोन Android 13 प्लॅटफॉर्मवर आधारित Funtouch OS 13 वर वर्क करतो. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी मोबाईलला IP54 रेटिंग देण्यात आली आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं, Vivo Y28 5G स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा मिळतोय तर समोरील बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. बाजारात Vivo Y28 5G च्या 4 GB+ 128GB मॉडेलची किंमत 13,999 रुपये आहे तर 6GB+ 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 15,499 रुपये आहे.