23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा होणार; ISRO मुख्यालयातून मोदींच्या 3 मोठ्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोने आपली तिसरी चांद्रयान -3 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे भारत देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर जाणारा पहिला देश ठरला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. तिथून आल्यानंतर नरेंद्र मोदी इस्रोच्या टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी, इस्रोच्या टीमच्या टीमला यशस्वी झालेल्या मोहिमेबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच, 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा होणार अशी मोठी घोषणा देखील केली.

23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन

ज्या दिवशी चंद्रयान 3 चंद्रावर उतरले तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट इथून पुढे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस प्रत्येक भारतवासी यांच्या कायम लक्षात राहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी, इस्त्रोच्या टीमची भेट घेऊन त्यांचे चंद्रयान 3 मोहिमेसाठी विशेष कौतुक केले. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झालेले देखील दिसले.

 

चंद्राच्या त्या जागेचं नाव ‘तिरंगा’

इतकेच नव्हे तर, “चांद्रयान -2 जेव्हा लाँच झालं त्याचवेळी आम्ही चंद्राच्या त्या जागेचं नाव ठेवणार होतो. पण मोहिम थोडक्यात हुकली आणि आम्ही ठरवलं की चांद्रयान -3 आणि 2 चं नाव एकत्रच ठेवायचं. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यानिमित्ताने घरोघरी तिरंगा देखील फडकला. त्यामुळे तिरंग्याशिवाय ही मोहिम अपूर्ण आहे. म्हणून त्या जागेला आम्ही ‘तिरंगा’ हे नाव दिलं आहे” अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.

 

चांद्रयान 3 उतरलेली जागा “शिवशक्ती पॉईंट”

मुख्य म्हणजे चांद्रयान 3 ज्या जागेवर उतरलं त्या जागेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती पॉईंट असे नाव दिले आहे. ही जागा भारताच्या वैज्ञानिकांच्या कार्याची साक्ष देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच, “ही शिवशक्ती जागा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल, यातूनच भारताच्या इच्छाशक्तीचं दर्शन होणार आहे” असं मोदी यांनी म्हटलं. अशाप्रकारे पंतप्रधान मोदी यांच्याकडून तीन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

तुमच्या कार्याला, धैर्याला सल्यूट..

दरम्यान, ‘हा भारताच्या विज्ञान सामर्थ्याचा शंखनाद असून देशाला अभिमान वाटावा असा आहे. मी दक्षिण आफ्रिकेत होतं. पण माझं मन तुमच्याकडे लागून राहिलेलं होतं. इस्रो सेंटरमध्ये आल्यावर मला वेगळाच आनंद वाटत आहे. भारतात येऊन लवकरात लवकर तुमचं दर्शन घ्यायचं होतं. मी तुम्हाला, तुमच्या कार्याला, धैर्याला सल्यूट करतो.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.