गृहकर्ज होणार स्वस्त!! मोदी सरकार सुरू करणार लवकरच ‘ही’ योजना; तब्बल 60 हजार कोटी खर्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या केंद्र सरकार लहान कुटुंबांसाठी नवीन गृहकर्ज अनुदान योजना अमलात आणण्याचा विचार करत आहे. या योजनेचा 25 लाख अल्प उत्पन्न गटातील लोकांना लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत मोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या गृह कर्जाचे सबसिडी किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण की, ही घरांच्या मागणीवर अवलंबून असेल. केंद्र सरकारची ही योजना अमलात आल्यानंतर त्याचा 25 लाख लोकांना फायदा घेता येईल. तसेच एका छोट्या कुटुंबाला आपल्या हक्काचे घर मिळेल.

योजनेचा लाभ कोणाला

मोदी सरकारकडून आणल्या जाणाऱ्या गृह कर्ज अनुदान योजनेअंतर्गत 25 लाख गृहकर्ज अर्जदारांना लाभ घेता येईल. काही महिन्यांमध्येच ही योजना सरकारकडून सुरू करण्यात येईल. अद्याप या योजनेची तारीख काय असेल हे निश्चित करण्यात आलेले नाही. या योजनेचा फायदा भाड्याच्या घरात, झोपडपट्टी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना घेता येणार आहे. तसेच लहान कुटुंब असणाऱ्यांना या योजनेचा फायदा होईल.

गृह कर्जाची रक्कम किती?

या योजनेबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र, या योजनेअंतर्गत 25 लाख अल्प उत्पन्न गटातील लोकांना 9 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते. त्यावर 3 ते 6.5 टक्के वार्षिक व्याज अनुदान दिले जाईल.

सबसिडी किती?

या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्जांवर 20 वर्षांच्या कालावधीसाठी ही सबसिडी मिळू शकते. व्याज सवलत थेट लाभार्थ्यांच्या गृह कर्ज खात्यावर जमा करण्यात येऊ शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या मोदी सरकार ही योजना लवकरात लवकर सुरू आणण्याचा विचार करत आहे. एकंदरीत नवीन वर्षामध्ये देखील या योजनेला सुरुवात होऊ शकते.