हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mofat Pithachi Girni Yojana। महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असत, सध्या राहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची हवा जोरात सुरु असून या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होत आहेत. लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून महिलावर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे. मोफत पिठाची गिरणी योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेअंतर्गत पिठाच्या गिरणीसाठी महिलांना अनुदान दिले जात आहे. या योजेनचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा? कोणकोणती कागदपत्रे त्यासाठी लागतात याचीच संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
मोफत पिठाची गिरणी योजना (Mofat Pithachi Girni Yojana) ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवली जाणारी एक कल्याणकारी योजना आहे, जी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र महिलांना 100% किंवा 90% अनुदानावर पिठाची गिरणी (चक्की) उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे त्यांना घरबसल्या लघुउद्योग सुरू करून पैसे कमवता येऊ शकतात. मात्र या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच एससी आणि एसटी कॅटेगिरी मधील महिलांनाच मिळणार आहे इतर प्रवर्गातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
नियम व अटी –
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
अनुसूचित जाती/जमाती किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असावी.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे
महिलांचे वय 18 ते 60 वर्षे असावे .
अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मागील ३ वर्षांत या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कागदपत्रे – Mofat Pithachi Girni Yojana
आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज कुठे करावा ?
ग्रामीण भागातील महिलांना जिल्हा परिषद कार्यालय किंवा तालुका पंचायत समितीत जाऊन ऑफलाइन अर्ज भरावा लागेल.
शहरी भागातील महिलांना महिला व समाज कल्याण विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यास पोर्टलवरून स्थिती तपासता येईल; ऑफलाइन अर्ज केलेल्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना घरगुती रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या योजनेमागचा (Mofat Pithachi Girni Yojana) मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी पिठाच्या गिरण्या मिळवून स्वतःचा लघुउद्योग सुरू केला आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे




