Mohammed Shami : मोहम्मद शमी IPL मधुन OUT; गुजरात टायटन्सला मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mohammed Shami : IPL 2024 सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल मधून बाहेर गेला आहे. शमीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. यासाठी त्याला ब्रिटनमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. त्यामुळे शमीच्या चाहत्यांना आणि गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) मोठा धक्का मानला जात आहे.

इंजेक्शनचा उपयोग झालाच नाही – Mohammed Shami

३३ वर्षीय शमी भारताकडून अखेरचा एकदिवसीय विश्वचषक फायनल नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो लंडनमध्ये घोट्याचे स्पेशल इंजेक्शन घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला असं सांगण्यात आले की तीन आठवड्यांनंतर तो हळू हळू धावेल आणि मैदानात सुद्धा पुनरागमन करेल. परंत्तू हे इंजेक्शन उपायकारक ठरलं नाही. त्यामुळे आता ऑपरेशन हाच त्यावर रामबाण उपाय ठरणार आहे. यासाठी तो लंडनला जाणार आहे. त्यामुळे आता त्याला आयपीएल खेळणं शक्य नाही. शमीच्या अनुपस्थीमुळे (Mohammed Shami) गुजरात टायटन्सला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर हि माहिती दिली.

दरम्यान, मोहम्मद शमी (Mohammed Shami) मागील काही दिवसांपासून तुफान फॉर्मात होता. नुकत्याच भारतात पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत पोचवलं होत. आयपीएल मध्येही शमीची कामगिरी उत्तम आहे. त्याने आयपीएल २०२३ मध्ये 17 सामन्यात 18.64 च्या सरासरीने सर्वाधिक 28 विकेट घेतल्या होत्या. शमीच्या एकूण आयपीएल कारकिर्दीबाबत बोलायचं झाल्यास, त्याने आतापर्यंत 110 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 26.87 च्या सरासरीने 127 बळी घेतले आहेत.