‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन; मोहीत कंबोज यांची ट्विटद्वारे टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. सध्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून महाप्रबोधन यात्रेच्या भाषणांतून भाजप, मनसे नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. यावरीन भाजप नेते मोहीत कंबोज यांनी टीका केली आहे. “शिवसेनेने संजय राऊत यांचे फीमेल व्हर्जन लाँच केले आहे, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.

मोहीत कंबोज यांनी ट्विटद्वारे म्हटले की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांचे फीमेल व्हर्जन लाँच केले आहे. सलीम जावेद आणि आता….? अशी टीका कंबोज यांनी केली आहे.

 सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

अलीकडे महाप्रबोधन यात्रेत म्हणाल्या होत्या.महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि राज्य चाले, अशी परिस्थिती आहे. तुम्ही काही बोललात तर आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो, असे होत आहे. महाप्रबोधन यात्रा सुनियोजित पक्षाचा कार्यक्रम आहे. मात्र, शिंदे गटाने पैसा प्रचंड पेरला आणि प्रचंड माणसे तोडली आहेत. एवढी सगळी माणसे तोडूनसुद्धा त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करायला एकही माणूस नाही. म्हणजे ‘सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा’ अशी त्यांची अवस्था आहे. पैशावर बुद्धी आणि निष्ठा विकत घेता येऊ शकत नाही, असे सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत टीका केली होती.