हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत(India Post Payments Bank) खात आहे, त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या अनेक ग्राहकांना फिशिंग घोटाळ्याचा फटका बसत आहे. फसवे कॉल्स आणि मेसेजेसद्वारे ग्राहकांकडून पॅन कार्डची माहिती मिळवून बँक खात्यातील पैसे चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे IPPB ने ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फिशिंग घोटाळा –
फिशिंग घोटाळा हा एक प्रकारचा ऑनलाइन धोखाधडीचा प्रकार आहे, ज्यात लोकांना त्यांच्या वैयक्तिक माहितीची चोरी करण्यासाठी फसवले जाते. फिशिंग हल्ला साधारणपणे ईमेल, टेक्स्ट मेसेजेस, किंवा वेबसाईट्सच्या माध्यमातून केला जातो, जे दिसायला एकदम खरे आणि विश्वासार्ह असतात. या धोखाधडीमध्ये, हॅकर्स किंवा धोखेबाज व्यक्ती तुम्हाला तुमचे पासवर्ड, बँक अकाउंट नंबर, क्रेडिट कार्ड माहिती इत्यादी गोष्टी मिळवण्यासाठी विविध ट्रिक्स वापरतात.
पॅन कार्ड घोटाळा –
IPPB च्या ग्राहकांना मेसेजद्वारे पॅन कार्डची माहिती अपडेट करण्याची मागणी केली जात आहे. मेसेजमध्ये असे म्हटले जाते की, जर पॅन कार्ड अपडेट केले नाही तर बँक खाते ब्लॉक केले जाईल. या मेसेजमध्ये एक लिंक दिलेली असते. अनेक जण घाबरून या लिंकवर क्लिक करतात आणि आपली सर्व माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती जातो. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो –
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक टीमने अशा संदेशांना खोटे ठरवले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, इंडिया पोस्ट कधीही ग्राहकांना अशा प्रकारचे मेसेज पाठवत नाही. अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही लिंक उघडू नका. फिशिंग स्कॅम हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे. स्कॅमर्स ग्राहकांना खोटे मेसेज, कॉल किंवा ईमेलद्वारे फसवून बँक खाते, पासवर्ड, पिन, क्रेडिट कार्ड डिटेल्स यासारखी महत्त्वाची माहिती मिळवतात. या माहितीचा वापर करून ग्राहकांचे खाते रिकामे केले जाते.
ग्राहकांनी हि दक्षता घ्यावी –
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
वैयक्तिक माहिती आणि पॅन कार्ड डिटेल्स शेअर करू नका.
ग्राहक सेवा क्रमांक तपासून खात्री करूनच कॉल करा.
संशयास्पद मेसेज आला तर PIB फॅक्ट चेक करून खात्री करा.
फसवे मेसेजचा स्क्रीनशॉट घ्या.
लगेच सायबर क्राईम पोर्टल (cybercrime.gov.in) वर तक्रार करा.
हे पण वाचा : पोस्ट ऑफिसच्या खास योजना!! एकदा गुंतवणूक केल्यास होईल लाखोंचा फायदा