पैशांची गरज आहे ? तर शॉर्ट टर्म लोन आणि क्रेडिट कार्ड्सपैकी कोणता चांगला पर्याय ठरू शकेल हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । माणसाच्या आयुष्यात कधीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. कधीकधी अचानक पैशांची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा शॉर्ट टर्म लोन (Short Term Loan) बद्दल विचार करते.

मनी टॅपचे सह-संस्थापक अनुज काकर म्हणाले की,”क्रेडिट कार्ड कधीकधी धोकादायक ठरू शकते, विशेषत: जर आपण वेळेवर बिल भरण्यास अपयशी ठरला किंवा आपण फक्त किमान रक्कम भरली आणि पुढील महिन्यात न भरलेल्या रक्कमेवर जास्त व्याज आकारले जाईल. याशिवाय क्रेडिट कार्डमध्ये फसवणूक आणि चोरीचा धोका देखील असतो. दुसरीकडे, जेव्हा शॉर्ट टर्म पर्सनल लोनचा विचार केला जातो तेव्हा आपण क्रेडिट कार्डपेक्षा अधिक लोन घेऊ शकता. पण यामध्ये एक पेच असा आहे जर आपण चांगला क्रेडिट स्कोअर कायम ठेवला असेल तरच या लोनवरील व्याज दर कमी केले जातील. यात इतरही कमतरता आहेत जसे की प्रीपेमेंट पेनल्टी इ.”

क्रेडिट कार्डचे फायदे
छोट्या खर्चासाठी अधिक चांगले आहे जे ऑनलाईन व्यवहारातून पेमेंट करता येऊ शकते. साधारणत: अनेक क्रेडिट कार्डे ही 30-50 दिवसांच्या व्याज-रहित प्री बिलिंग मुदतीसह येतात. ही एक रिवॉल्विंग लाइन आहे, म्हणून ती पुन्हा पुन्हा वापरली जाऊ शकते. अनेक क्रेडिट कार्डे व्यवहारांवर रिवॉर्डसही देतात, जे कॅशबॅक, गिफ्ट कूपन इत्यादींसाठी वापरले जाऊ शकतात. क्रेडिट कार्ड कोणत्याही अनियोजित खर्चासाठी मदत करते. भविष्यातील फायद्यासाठी कार्डची मर्यादा चांगल्या रीपेमेंट ट्रॅकसह वाढते.

क्रेडिट कार्डचे नुकसान
अनेक क्रेडिट कार्डे कॅश पैसे काढण्याची परवानगी देत ​​नाहीत किंवा त्यासाठी खूप जास्त शुल्क आकारतात. क्रेडिट कार्डद्वारे खर्च नियंत्रित करण्यात अडचण होते आणि यामुळे भविष्यात रीपेमेंट करण्यात देखील अडचण येऊ शकते. सामान्यत: क्रेडिट कार्डावर 36-42 टक्के व्याज दर असतो, जो खूपच जास्त असतो आणि जर आपली थकबाकी वेळेवर न भरली गेल्यास ते खूप महाग असल्याचे सिद्ध होऊ शकते.

शॉर्ट टर्म लोनचे फायदे
कॅश किंवा एकरकमी पेमेंट रक्कम आवश्यक असलेल्या खर्चासाठी शॉर्ट टर्म लोन अधिक चांगली असतात. घेतलेली रक्कम आणि परतफेड कालावधी मर्यादित आहे, म्हणून हे नियोजित खर्चांवर नियंत्रण ठेवते. सामान्यत: क्रेडिट क्रेडिट मर्यादेपेक्षा शॉर्ट टर्म लोनमध्ये आपल्याला मोठी रक्कम मिळू शकते. शॉर्ट टर्म लोनच्या रीपेमेंटचा कालावधी 3 ते 12 महिने आहे. शॉर्ट टर्म लोनच्या तुलनेत क्रेडिट कार्ड बिलांवर अधिक व्याज आकारले जाते.

शॉर्ट टर्म लोनचे नुकसान
90 दिवसांपेक्षा शॉर्ट टर्मचे लोन टाळले पाहिजेत. हे आपल्याला कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकते. शॉर्ट टर्म लोन हे एक-वेळचे समाधान असते, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला नवीन निधीची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याला पुन्हा कर्जासाठी अर्ज करावा लागेल आणि पुन्हा पात्रता घ्यावी लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment