ED कडून जप्त करण्यात आलेल्या पैशाचे काय करणार?? मोदींची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मागील काही वर्षांपासून ईडी कारवाईचा (ED Action) धडाका सुरु आहे. ईडीने आत्तापर्यंत करोडो रुपये जप्त केलेत. विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडीची कारवाई करण्यात येत आहे असा आरोप विरोधी पक्ष करत असतो. यावरून केंद्र सरकार वर निशाणा सुद्धा साधण्यात येतो. मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ED कडून जप्त करण्यात आलेल्या पैशाबाबत एक मोठं विधान केलं आहे. ED कडून जप्त करण्यात आलेला पैसा गरिबांसाठी वापरण्यात येईल असं मोदींनी म्हंटल आहे.

पश्चिम बंगाल येथील कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात असलेल्या राजघराण्यातील सदस्य आणि भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणादरम्यान बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांनी सामान्य जनतेचा पैसा लुटला आहे, कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिलेत तर कोणी क्लार्क होण्यासाठी पैसे भरलेत. परंतु ईडीने या भ्रष्ट लोकांची मालमत्ता आणि पैसा जप्त केला आहे. आता हा जप्त केलेला पैसे गरीब जनतेला परत देण्यात येईल. त्यासाठी आपण कायदेशीर पर्याय शोधत आहोत असेही मोदींनी म्हंटल.

दरम्यान, बंगालचा वारसा जतन करण्याचे आव्हान तुमच्यासमोर असल्याचे पंतप्रधानांनी अमृता रॉय याना सांगितलं. बंगाल निवडणूक आता दोन गटात विभागली आहे. यातील आमचा गट हा भ्रष्टाचाराला कायमचा नष्ट करण्यासाठी काम करतोय, तर दुसरा गट भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी एकवटत आहे. विरोधकांचा प्राधान्यक्रम देश वाचवण्याला नसून सत्ता वाचवण्याला आहे असं म्हणत मोदींनी विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला.