इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण; Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाचे खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा नोटांचा पाऊस पाडण्यात आला आहे . औरंगाबाद येथील आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैशाची उधळण केली आहे. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे कार्यकर्त्यांनी पैशाचा पाऊस पाडला होता.

इम्तियाज जलील यांच्यावर आमखास मैदानावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहेत तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं आहे. शुक्रवारी याच मैदानावर जलील यांनी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कव्वाली सुरू असताना जलील या ठिकाणी आले असता त्यांच्या समर्थकांकडून नोटांचा पाऊस पाडण्यात आला. एकीकडे मराठवाड्यात पिकांचे नुकसान झालं असून शेतकरी संकटात असताना दुसरीकडे जलील यांच्यावरील पैशाची उधळण यांमुळे जनतेत नाराजी पसरण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळं अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. परंतु शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही इम्तियाझ जलील एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर केले नाहीत. त्यातच आता जलील यांच्यवर पैशाची उधळण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत