Monkeypox | जगभरात वाढला मंकीपॉक्सचा उद्रेक; महाराष्ट्र आरोग्य विभागाने केली नियमावली जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Monkeypox | काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोना या विषाणूचे संकट आले होते. या आजारातून आणि संकटातून देश आता कुठे सावरलेला आहे. तर पुन्हा एकदा जगात मंकीपॉक्स या साथीच्या आजाराने धाड घातलेली आहे. मंकीपॉक्स हा एक साथीचा आजार आहे. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येण्याने या रोगाची लागण वाढते. संपूर्ण जगामध्ये सध्या या रोगाचा धोका वाढलेला आहे. आता याच मंकीपॉक्स रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अजून तरी मंकीपॉक्स (Monkeypox) रोगाचा रुग्ण आढळलेला नाही तरी. देखील आधीपासूनच खबरदारी घेण्यासाठी राज्य आरोग्य विभागाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

मंकीपॉक्स हा एक साथीचा आजार आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मंकीपॉक्स हा आजार झाला असेल. आणि त्याच्या संपर्कात जरी तर व्यक्ती आली, तर त्या व्यक्तीला देखील या रोगाची लागण होऊ शकते. जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या रोगाने आजाराने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्र राज्यात अजून तरी या आजाराचा रुग्ण सापडलेला नाही. तरी देखील आधीपासून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक राधा कृष्ण पवार यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, जर मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराची लक्षणे दिसली, तर त्वरित रुग्णालयात संपर्क साधावा. त्यामुळे लवकरात लवकर त्यावर उपचार देखील करता येईल. आता मंकीपॉक्स आजाराची नक्की लक्षण काय आहेत? या गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील याची खूप मदत होईल.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे | Monkeypox

मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या अंगावर लाल पुरळ येतात. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होतो. अत्यंत तीव्रतेचा ताप येतो. घसा खवखवतो, डोकेदुखी होते, अंगदुखी होते त्याचप्रमाणे हात पायांना सूज येते. मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेल्या रुग्णांच्या घशात जबड्याखाली मांडीवर लाल पुरळ येतात. त्या व्यक्तीला तसेच पाणी घेताना देखील त्रास होतो. हा व्यक्ती जर प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर त्याला या आजाराची लक्षणे दिसण्यास पाच ते वीस दिवस ल लागू शकतात. सध्या आफ्रिकन देशांमध्ये हा व्हेरिएट मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

त्या सध्या या आजारासाठी ते उद्रेक झालेला दिसून येत आहे. या आजारामुळे मृत्यूदर सध्या 11% इतका आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अशी परिस्थिती येऊ नये आणि आली तरी त्यावर नक्की काय यंत्रणा आणता येईल. याबद्दलची खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे. त्यामुळे तुम्हाला जर वरील कोणतीही लक्षणे आढळली, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि त्यावर उपचार चालू करा. तसेच तुम्हालाही लक्षणे दिसल्यास दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जाणे टाळा.