Monsoon 2024 : शेतकऱ्यांनो, यंदा 106% पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon 2024) भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याबाबतचे अंदाज शेअर करताना, भारतीय हवामान विभागाने सांगितले की, यावर्षी 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे जो सरासरी पेक्षा जास्त असेल. तसेच या मान्सूनच्या पावसाचा LPA (1971-2020) 87 सेमी आहे.भारतीय हवामान विभाग IMD ने ट्विट करत म्हंटल, नैऋत्य मोसमी मोसमात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण देशात पाऊस पडेल असा अंदाज आहे ( जो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 104%असेल ) तसेच ± 5% च्या मॉडेल त्रुटीसह हंगामी पाऊस LPA च्या 106% असण्याची शक्यता आहे.

सध्या, विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशात मध्यम एल निनो परिस्थिती प्रचलित आहे. नव्या मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम (MMCFS) तसेच इतर हवामान मॉडेलच्या अंदाजानुसार, एल निनो स्थिती पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात तटस्थ एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) स्थितीत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे आणि मान्सूनच्या (Monsoon 2024) उत्तरार्धात ला निना परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या, हिंदी महासागरावर तटस्थ हिंद महासागर द्विध्रुव (IOD) परिस्थिती प्रचलित आहे आणि नवीन हवामान अंदाजानुसार नैऋत्य मान्सूनच्या उत्तरार्धात सकारात्मक IOD परिस्थिती विकसित होण्याची शक्यता आहे.

मे महिन्याच्या अखेरीस आणखी अपडेट्स मिळणार – Monsoon 2024

दरम्यान, दरवर्षी देशातील बळीराजा आतुरतेने पावसाची आणि भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची वाट बघत असतो. देशात किती पाऊस पडणार याची उत्सुकता शेतकऱ्याला असते. त्याच पार्श्वभूमीवर आज भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत अपडेट जाहीर केले आहेत. हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा अपडेटेड पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी हवामान विभागाकडून सांगण्यात येईल. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.