संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल- हवामान विभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । निसर्ग चक्रीवादळानंतर राज्यात गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची देशातील इतर राज्यांकडील वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यास थोडासा उशीर होईल, असे सध्याच्या वाटचालीवरुन दिसून येत आहे.

निसर्ग चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सून रखडला होता. आता केरळातील मान्सूनची प्रगती दिसून येत आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. पुढील तीन दिवसात मान्सून हा कर्नाटक, तामिळनाडू, पद्दुचेरी, बंगालच्या दिशेने वाटचाल करतआहे. आग्नेय तसेच मध्य-पश्चिम बंगालच्या खाडी किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल, असा अंदाज आहे. त्यानंतर गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल.

गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील २४ तासात मान्सून सक्रीय होईल आणि मान्सून महाराष्ट्राकडे वाटचाल करेल, असा अंदाज आहे. हा मान्सून १० जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होईल. कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे, बारामती, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, अहमदनगर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment