Monsoon Tips : पावसाळा कुणाला आवडत नाही? पावसाळ्यातील गारवा हवाहवासा वाटतो. शिवाय बाहेरचे वातावरण देखील हिरवेगार आणि प्रफुल्लित होऊन जाते. मात्र पावसाळ्यात फर्निचरची खास देखभाल करावी लागते. कारण या दिवसात फर्निचरला ओलावा आणि वाळवी लागण्याची भीती असते. त्यामुळे योग्य वेळी काळजी न घेतल्यास वाळवी आणि ओलावा तुमचे सुंदर आणि महागडे फर्निचर खराब करू शकतात. मात्र काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे फर्निचर बऱ्याच प्रमाणात सुरक्षित ठेवू शकता. चला तर मग जाणून (Monsoon Tips) घेऊया…
फर्निचर स्वच्छ आणि कोरडे ठेवा (Monsoon Tips)
फर्निचर स्वच्छ करण्यासोबतच पावसाळ्यात ते कोरडे ठेवणेही खूप गरजेचे आहे. फर्निचरवर साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ करण्यासाठी, ओल्या कपड्याने नव्हे तर कोरड्या कपड्याने फर्निचर पुसून घ्या . यामुळे आर्द्रतेची समस्या दूर होईल आणि वाळवी लागण्याचा धोकाही दूर होईल.
नॅप्थालीनचे गोळे वापरा
वळविला दूर ठेवण्यासाठी नेफ्थलीन बॉल्स खूप प्रभावी आहेत. हे गोळे तुम्ही तुमच्या कपाट, ड्रॉवर आणि इतर फर्निचरमध्ये ठेवू शकता. नॅप्थालीन आर्द्रता
नियंत्रित (Monsoon Tips) करते.
अँटी टर्माइटची फवारणी करा
फर्निचरवर अँटी-टर्माइट स्प्रे स्प्रे करा. यामुळे वाळवीचा धोका कमी होईल आणि तुमचे फर्निचरही सुरक्षित राहील. या फवारणीचा वापर विशेषत: ज्या ठिकाणी वाळवी असण्याची शक्यता असते अशा (Monsoon Tips) ठिकाणी करा.
वेंटिलेशनकडे लक्ष द्या (Monsoon Tips)
पावसाळ्यात खोल्यांमध्ये हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या. यामुळे ओलावा कमी होतो. दिवसा शक्य असल्यास, खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जेणेकरुन सूर्यप्रकाश आणि खोल्यांमध्ये हवा खेळती (Monsoon Tips) राहील.
फर्निचर भिंतीपासून दूर ठेवा (Monsoon Tips)
फर्निचर भिंतीपासून थोडे दूर ठेवा, जेणेकरून भिंतीतून येणारा ओलावा थेट फर्निचरपर्यंत पोहोचणार नाही. भिंत आणि फर्निचरमध्ये थोडे अंतर ठेवल्यास ओलाव्याचा प्रभाव कमी होईल आणि वाळवीचा धोकाही (Monsoon Tips) कमी होईल.