Monsoon Tourism : धबधब्याखाली मनमुराद भिजण्याचा आनंद लुटायचाय? आंबोली घाटाचे पर्यटन ठरेल खास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, महाराष्ट्रात सर्वत्र पावसाच्या सऱ्या कोसळत असून या दिवसात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन (Monsoon Tourism) करून मनमोहक दृश्यांचा आस्वाद घ्यावा आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचा अनुभव घेता यावा म्हणून आपण अनेक ठिकाणी पर्यटन करण्याचा बेत आखत असतो. महाराष्ट्रात पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी अनेक ठिकाणी आहेत, त्यामुळे नेमकं कुठे कुठे जायचं असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. तुम्ही सुद्धा कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायची याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला कोकणातील आंबोली घाटाचा पर्याय देत आहोत. आंबोली घाट हा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी जाणे नक्कीच बेस्ट ठरेल.

Amboli Ghat
Amboli Ghat

सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत, समुद्र पाटी पासून अंदाजे ६९० मीटर उंचीवर असलेल आंबोली घाट हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत. आंबोलीला जाताना घाटवळण रस्त्याने प्रवास करावा लागतो. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी हे पर्यटन स्थळ अतिशय जवळ असून सातारा, कोल्हापूर आणि सांगलीवरून अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात याठिकाणी जातात. खास करून पावसाळ्याच्या दिवसात (Monsoon Tourism) विकेंडला पर्यटक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Amboli Ghat
Amboli Ghat

आंबोली घाट हे येथील धबधब्यांसाठी खास प्रसिद्ध आहे. आंबोलीत पावसाळयात भरपूर पाऊस पडतो. संपूर्ण परिसरात दाट धुकं, उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे आणि मुसळधार पाऊस असा निसर्गाचा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटकांची पाऊले आंबोली घाटाकडे आपोआप वळतात. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाचा खराखुरा आनंद तुम्हाला आंबोली घाटात मिळेल यात शंकाच नाही.

आंबोली मधील पर्यटनाची मुख्य आकर्षणे कोणती? (Monsoon Tourism)

आंबोली धबधबा, हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान , कावळेशेत पॉईंट, नांगरतास धबधबा, बाबा धबधबा, रामतीर्थ अशा आकर्षक पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्ही पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता. याठिकाणी असलेलं सनसेट पॉईंट हे सुद्धा मुख्य आकर्षणापैकी एक आहे, येथून संपूर्ण घाटमाथ्याचे, दऱ्यांचे आणि टेकड्यांचे मनमोहक दृश्य दिसते.

आंबोली घाटाकडे कस जायचं?

आंबोली घाटाकडे जाण्यासाठी कोल्हापूर वरून तुम्ही बस किंवा इतर कोणत्याही खासगी वाहनाने जाऊ शकता. जर तुम्हाला रेल्वेने जायचं असेल तर सावंतवाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु ते आंबोली घाटापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर विमानाने जायचा विचार केलयास गोव्यातील मोप विमानतळ 40 किलोमीटर अंतरावर आणि सिधुदुर्ग येथील चिपी विमानतळ 70 किलोमीटर अंतरावर आहे.