हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, उन्हाळा संपत आला असून महाराष्ट्रात मान्सूनचे आगमनही झालं आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडून कुठेतरी लांब फिरायला जावं आणि निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा (Monsoon Tourism) मनसोक्त आनंद घ्यावा असं अनेकांना मनोमनी वाटत असत. तुम्हीही अशाच एका पर्यटन स्थळाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला असं एक ठिकाण सांगणार आहोत, जे महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, त्याठीकाणचे निसर्गरम्य परिसर अगदी तुमच्या मनाला मोहित करेल, आणि तुमच्या डोळ्याचे अक्षरश पारणे फिटेल…. हे ठिकाण आहे ताम्हिणी घाट…
ताम्हिणी घाट म्हणजे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण. मुंबईपासून ताम्हिणी घाट १६० किलोमीटर आणि पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला ताम्हिणी घाटात जायचं असेल तर त्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागेल.त्याठिकाणी असलेल्या कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. ताम्हिणी घाट परिसरातील हिरव्यागार दऱ्या, मुळशी धरण, कडेलोटावरुन पडणारे छोटेमोठे धबधबे तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील.
बहरलेला निसर्ग आणि हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेल्या या घाटाचे वर्णन करायचं झाल्यास त्याला निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा साक्षात्कारच म्हणावा लागेल. त्यामुळेच खास करून पावसाळयाच्या दिवसात ताम्हिणी घाटात पर्यटक मोठ्या प्रमाणात जमतात आणि निसर्गाचा आस्वाद घेतात. ताम्हिणी घाटात आल्यावर एखाद्या स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे तुम्हाला वाटेल. तुम्हाला सुद्धा पावसात चिंब भिजायचं असेल आणि पावसाळ्याचा मस्त धमाल आणि मौज मस्ती करायची असेल तर एकदा तरी ताम्हिणी घाटात जावाच.
ताम्हिणी घाटात कसे जावे ?
ताम्हिणी घाट मुंबईपासून १६० किलोमीटर आणि पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईकडून येताना लोणावळा उतरून ऑबी व्हाली रस्त्याने ताम्हीनिकडे जाता येते . तसेच पुणे आणि साताऱ्यावरूनही याठिकाणी जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस किंवा खाजगी बसेस उपलब्ध आहेत. या पर्यटन स्थळापर्यंत जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ हे पुण्याचेच आहे.