हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Monsoon Tourist Places Near Pune । महाराष्ट्रात मान्सून धडकला असून सर्वत्र पावसाची रिमझिम बघायला मिळत आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्यांना पावसाने अक्षरशः गार गार केलं आहे. पावसाळा म्हंटल कि निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा आणि निसर्गाशी एकरूप होवून आनंद लुटण्याचा मोह प्रत्येकालाच असतो. मस्त पैकी कुठेतरी फिरायला जावं आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यावा असं सर्वानाच वाटत. पण नेमकं जायचं कुठे? हा पहिला प्रश्न पडतो. तुम्हीही याच पेचात असाल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या आसपास असणाऱ्या ५ निसर्गरम्य ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे पावसाळ्यात जाऊन तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता… पावसाळ्यात एन्जॉय करू शकता.
१) लोणावळा-खंडाळा-
लोणावळा आणि खंडाळा हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील दोन लोकप्रिय अशी हिल स्टेशन्स आहेत. पावसाळ्यात (Monsoon Tourist Places Near Pune) हिरवीगार झाडी, धबधबे आणि धुक्याने हे हिल स्टेशन नटलेले असतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर असलेलं हे ठिकाण पावसाळी सहलीसाठी सर्वात जास्त लोकप्रिय मानलं जाते. याठिकाणी भुशी डॅम, टायगर्स लिप, राजमाची पॉइंट, लोणावळा तलाव यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत. पावसाळ्यात धबधब्यासारखा वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि आसपासची हिरवळ यामुळे भुशी डॅम हा पर्यटकांचा आवडता स्पॉट ठरतो. टायगर्स लिप डोंगराच्या टोकावरून खंडाळ्याच्या घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. तर पावसाळ्यात लोणावळा तलावाभोवतीचा परिसर अत्यंत रमणीय दिसतो. धबधबे, धुके आणि थंड हवामान यामुळे लोणावळा खंडाळ्याच्या निसर्गाचा अनुभव अविस्मरणीय होतो.

२) मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट
मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट हे पावसाळ्यातील सर्वात नयनरम्य ठिकाणांपैकी एक आहे. मुळशीच्या थोडं पुढे गेलं कि महाडच्या दिशेनं जाताना हा घाट लागतो. डोगर- दऱ्या आणि ओसंडून वाहणारे धबधबे यामुळे पर्यटक याठिकाणी मंत्रमुग्ध होतात. ताम्हिणी घाटातील धबधबे आणि मुळशी धरणाचा पाण्याचा साठा यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आदर्श म्हंटल जाते. ताम्हिणी घाटात रस्त्याच्या कडेला अनेक धबधबे पाहायला मिळतात, पावसाळ्यात हे धबधबे पूर्ण बहरात असतात. तर दुसरीकडे मुळशी धरणाच्या पाण्याभोवती हिरव्या डोंगररांगा आणि धुके यामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठी बेस्ट मानलं जाते.Monsoon Tourist Places Near Pune

३) सिंहगड
पुण्यापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेला ऐतिहासिक असा सिंहगड किल्ला खास करून ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील डोंगररांगा हिरव्या चादरीने झाकलेल्या दिसतात, आणि धुके आणि ढग यामुळे वातावरण थरारक बनते. सिंहगड किल्ल्याच्या टोकावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे आणि खोऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. याठिकाणी असलेल्या काल्याचा कोंडणा येथील हिरवळ आणि धबधबे पाहण्यासारखे असतात. पुण्यापासून अगदी जवळ असल्याने विकेंडला सिंहगड किल्ल्यावर पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
४) माथेरान– Monsoon Tourist Places Near Pune
पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरानला खाजगी वाहनाने किंवा रेल्वेने तुम्ही जाऊ शकता. माथेरान हे इको-फ्रेंडली हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात धुके, हिरवळ आणि धबधबे यामुळे निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच… सुट्टीच्या दिवशी माथेरान हे पर्यटकांनी चांगलंच भरलेलं असत. याठिकाणी पॅनोरमा पॉइंट, लुईसा पॉइंट,चार्लोट तलाव, यांसारखी निसर्गरम्य दृशे तुम्ही पाहू शकता. धबधबे आणि हिरव्या डोंगरांचे सौंदर्य, सह्याद्रीच्या खोऱ्यांचे विहंगम दृश्य नक्कीच तुमचे मन मोहित करेल.

५) माळशेज
माळशेज घाट हा निसर्ग प्रेमींना एक अद्वितीय अनुभव देतो. येथील घनदाट जंगल, भव्य डोंगर रांगा, आणि विस्तीर्ण शेतजमीन पर्यटकांच्या मनाला आकर्षित करतात. पुणे शहरापासून माळशेज घाट साधारणतः १२५ किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्याच्या काळात येथील धबधबे विशेषतः आकर्षक असतात. डोंगर, धबधबे, हिरव्यागार वनस्पती यामुळे माळशेज घाटाचे सौंदर्य चांगलंच फुलले आहे. खास करून पावसाळ्यात माळशेजचाय सौंदर्यात आणखी भर पडते. जून- जुलै मध्ये याठिकाणी पर्यटकांची मोठी रीघ बघायला मिळते.




