Monsoon Travel | महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. आणि पाऊस पडल्यावर ती पर्यटकांची पावले ही अलगतच निसर्गाकडे वळली जातात. हिरवा डोंगर तसेच सर्वत्र पसरणारी हिरवाई अनेकांना आवडते. त्यामुळे अनेक लोक हे पावसाळ्याच्या दिवसात फिरायला जात असतात. त्यातही महाराष्ट्रातील लोणावळा हे ठिकाण पावसाळ्यातील पर्यटन स्थळांपैकी एक लोकप्रिय असे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक लोक हे पावसाळ्यामध्ये लोणावळ्याला भेट नक्की देतात. आता तुम्ही देखील या वीकेंडला जायचा प्लॅन करायचा असेल. परंतु तिथे जाऊन नक्की काय पाहायचे? तुम्हाला हे कळत नसेल तर तर आज आम्ही तुम्हाला लोणावळ्यातील ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच छान वाटेल. आणि तुमची सहल देखील चांगली होईल. आता या तीन ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
राजमाची पॉईंट | Monsoon Travel
राजमाची पॉईंट हा लोणावळ्यावरील एक लोकप्रिय पॉइंट आहे. येथील आजूबाजूला हिरवे गार डोंगराईचे सुंदर असे दृश्य दिसते. त्यामुळे तुम्ही जर लोणावळ्याला फिरायला जात असेल, तर या ठिकाणी नक्की जा निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण एक मेजवानीच असणार आहे. कारण तिथून तुम्हाला उंच उंच डोंगर डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहायला मिळतील. तसेच ट्रेकिंगचा अनुभव देखील तुम्हाला घेता येईल. लोणावळा हे शहर मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून जवळच्या अंतर आहे. या ठिकाणावरून तुम्हाला शिवाजी किल्ला देखील पाहायला मिळेल. किल्ल्याचे तटबंदी वरून आजूबाजूच्या परिसराचे तुम्हाला दर्शनही घेता येईल.
भुशी डॅम
पावसाळ्यात लोणावळ्यातील भुशी डॅम खूपच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक जातात या धरणाच्या बाजूला तुम्हाला विविध सुंदर धबधबे पाहायला मिळतील. पावसाळ्यामध्ये भुशी धरण हे एक पर्यटकांचे आकर्षण आहे. अनेक लोक भुशी डॅमला भेट देण्यासाठी लांबून लांबून येतात. परंतु या ठिकाणी जाताना काळजी घेणे खूप गरजेचे असते अन्यथा नुकसान होऊ शकते.
लोहगड किल्ला | Monsoon Travel
या पावसाळ्यात जर तुम्ही लोणावळ्याला गेलात, तर लोहगड हा किल्ला नक्की बघा. या ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील. या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. पर्यटकांची गर्दी पावसाळ्यासोबत इतराने ऋतूमध्ये देखील असते. त्यामुळे जर तुम्ही लोणावळ्याला भेट देणार असाल, तर लोहगड या किल्ल्याला नक्की भेट द्या