Monsoon | पावसाला महाराष्ट्रात चांगली सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरू झालं की, आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते. आणि आपोआपच आपली पावले घराच्या बाहेर वळतात. हिरवा गार निसर्ग, डोंगरावरून वाहणारे धबधबे वेगवेगळ्या प्रकारची फुलं ही माणसाला मोहित करतात. आणि त्यामुळे अनेक लोक पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. परंतु फिरण्यासाठी नेमके कोणत्या ठिकाणी जावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. कारण बाहेर गेल्यावर तिथे थंड हवेचं अनुभव घेता आला पाहिजे, धुक्यात हरवलेला डोंगर त्याचप्रमाणे रस्त्याने जाताना चहा, कांदा भजी या सगळ्याचा आनंद घेता आला पाहिजे. अशी ठिकाण मिळणं खूप गरजेचे असते. आता आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात सगळा आनंद घेऊ शकता.
लोणावळा खंडाळा | Monsoon
पावसाळ्यामध्ये लोणावळा खंडाळा या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी ही अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. या ठिकाणी टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी डॅम यांसारखे अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी हिरवागार निसर्ग डोंगरावरून वाहणारे धबधबे यांसारख्या गोष्टी दिसतील.
माथेरान
माथेरान हे एक हिल स्टेशन आहे. परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते. कारण येथील निसर्ग लोकांना मोहित करतो. या ठिकाणी अनेक पॉईंट्स देखील आहे याचप्रमाणे अनेक डोंगरदर्यांचे सुंदर अशी दृश्य तुम्हाला माथेरानमध्ये पाहायला मिळतील. पुणे आणि मुंबईच्या पर्यटकांसाठी माथेरान हे अत्यंत सोयीचे ठिकाण आहे.
माळशेज घाट
माळशेज घाट हा देखील पावसाळ्यात फिरण्याचे खूप चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अंगावर सरी झेलत दाट धुक्यामध्ये वातावरण पाहायला मिळेल. या ठिकाणी अगदी हिरव्या झाडांमधून रस्ता जातो. या ठिकाणी तुम्हाला अनेक सर्वोत्तम ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे या पावसाळ्यात माळशेजला नक्की भेट द्या.
इगतपुरी
तुम्हाला जर रस्त्यालगतच धबधबे हिरवागार निसर्ग या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही इगतपुरी या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. या ठिकाणाला धबधब्याचे माहेर घर असे म्हटले जाते. तसेच इगतपुरीला फॉग सिटी असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी अनेक गड किल्ले आणि धबधबे देखील आहेत.
भीमाशंकर
पावसाळ्यामध्ये भीमाशंकरला देखील अनेक लोक भेटी देतात. कारण या ठिकाणी हिरवा गार निसर्ग, नद्यांचा परिसर आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक ट्रेकिंग करतात. या ठिकाणी तुम्हाला विविध प्राणी पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे इथे अनेक देवस्थाने आणि हिल स्टेशन देखील आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरू हा या भागात आढळतो. या भागात तुम्ही निसर्गाचा चांगला आनंद घेऊ शकता.