Monsoon Trek : लहान मुलांना घेऊन मान्सून ट्रेकिंग करायचंय? कुठे जायचं कळत नाहीये? लगेच जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Trek) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांना निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचे वेध लागतात. खास करून पर्यावरण प्रेमी आणि ट्रेकर्स पावसाळ्यात बरेच प्लॅन आखतात. महाराष्ट्रात पावसाच्या किंचित सरी बरसू लागल्या की, ट्रेकर्सच्या ट्रेकिंग प्लॅन्सची आखणी सुरु होते. मस्त हिरवाईने नटलेल्या डोंगर आणि कड्याकपाऱ्यांचे सौंदर्य न्याहाळत धाडसी ट्रेकिंग करण्याची मजा शुभ्र धुक्यात आणखीच वाढते.

बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं असतात आणि त्यामुळे पालकांना ट्रेकिंगची आवड मनातच मारावी लागते. पण यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला असं काहीही करण्याची गरज नाही. कारण तज्ञ सांगतात, लहान मुलांना कमी वयात ट्रेकिंगला घेऊन जाणे चांगले आहे. पण मग नेमकं मुलांचं वय किती असावं आणि मुलांना घेऊन कोणते ट्रेक करावे? याविषयी जाणकार काय सांगतात ते जाणून घेऊ.

लहान मुलांना कोणत्या वयात ट्रेकवर घेऊन जावं? (Monsoon Trek)

ट्रेकिंग क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, मुलांना शक्य तितक्या कमी वयात ट्रेकिंगला घेऊन जा. मात्र, यावेळी पालकांनी काही गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. जस की, ट्रेकिंगला जाण्यापूर्वी आपली मुलं शारीरिक रित्या सक्षम आहेत का? याची तपासणी करून घ्या. कारण लहान मुलांच्या शरीरात प्रतिदिवशी बदल होत असतो. त्यांच्या स्नायूंची रचना बदलत असते. (Monsoon Trek) त्यामुळे सर्वसाधारणपणे तुमचे मुले ३ वर्षापेक्षा जास्त वयाची असताना त्यांच्या मनात ट्रेकिंगविषयी आवड निर्माण करा आणि मग ट्रेकिंगला घेऊन जा. मुलांना लहान वयापासूनच निसर्गाच्या सानिध्ध्यात वावरण्याची सवय लावा. यामुळे त्यांना निसर्गाबाबत आवड आणि आदर निर्माण होईल.

समुद्रकिनारी वाळूत चालणे, नदीकिनारी विविध आकाराचे दगड गोळा करणे अशा त्यांना गंमत वाटेल अशा कृती करून घ्या. यामुळे तुम्ही मुलांमध्ये ट्रेकिंगची आवड रुजवू शकाल. ४ ते ५ वर्षांची मुलं चपळ व अधिक सक्रिय असतात. त्यामुळे या वयात त्यांना कमी उंचीचे चढ, डोंगर आणि गवताळ भागांवर फिरायला न्या. (Monsoon Trek) पक्षी निरीक्षण, वृक्ष निरीक्षण शिकवा. यातून त्यांना निसर्गाबाबत ओढ आणि आत्मियता वाटेल. पुढे वयाच्या ६ ते ७ वर्षात मुलांना बिनधास्त ट्रेकिंगला न्या. एव्हाना दगड- खडकाळ वाटेवर चालणे त्यांच्यासाठी सोपे आणि रंजक झालेले असते. तसेच वयाच्या १० व्या वर्षापर्यंत मुलं स्वत:चा तोल सावरायला शिकलेली असतात. त्यामुळे एखाद्या ट्रेकचा घेण्यायोग्य त्यांना समज आलेली असते.

लहान मुलांना घेऊन जाता येईल असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेक कोणते?

जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन ट्रेकिंगला जायचा विचार करत असाल तर मुलांच्या क्षमतेचा विचार करून ट्रेक पॉईंट्स निवडा. यासाठी प्रबळमाची ट्रेक, कर्नाळा ट्रेक, सोंडई ट्रेक, कोरिगड ट्रेक, वन ट्री हिल पॉईंट ट्रेक, माथेरान, लोहगड ट्रेक बेस्ट ठरतील. तसेच तुमची मुले ९ ते १० वर्षाची असतील तर त्यांना हिमालयन ट्रेकसाठी घेऊन जा. (Monsoon Trek) यासाठी देओरीताल चंद्रशिला ट्रेक, केदारकंथा ट्रेक, ब्रह्मताल ट्रेक, हर की दून ट्रेक, बिआस कुंड ट्रेक, भ्रिगू लेक ट्रेक यांपैकी एखादा पॉईंट निवडा.

लक्षात ठेवा

तुमची मुले लहान असल्यामुळे ट्रेकिंगला जाताना त्यांची शारीरिक क्षमता आधी लक्षात घ्या. कारण ट्रेकिंगसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य महत्वाचे असते. शिवाय प्रत्येक ट्रेक त्यांना जमेलच असा हट्ट करू नका. (Monsoon Trek) कारण ते शक्य नाही. म्हणून, प्रत्येक ट्रेक पॉईंटसंदर्भात आवश्यक असलेली सगळी माहिती योग्यरित्या मिळवा आणि मगच मुलांना ट्रेकिंगला न्यायचं का नाही? याचा निर्णय घ्या.