दरमहा नियमित पेन्शन हवीये? तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारबरोबर पोस्ट ऑफिसकडून देखील आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सध्या अशीच एक योजना पोस्ट ऑफिसकडून राबवली जात आहे, ज्या योजनेचे नाव आहे मासिक उत्पन्न योजना. (Monthly Income Plan) या योजनेंतर्गत ग्राहकांना दरमहा पेन्शन देण्यात येते. या योजनेमध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यानंतर याचा लाभ तुम्हाला आयुष्यभर होऊ शकतो. त्यामुळे ही योजना नक्की काय आहे या योजनेत किती गुंतवणूक करावी लागते? हे जाणून घ्या.

मासिक उत्पन्न योजनेची माहिती (Monthly Income Plan)

लोकप्रिय योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेचा देखील समावेश आहे. या योजनेसाठी तुम्हाला पाच वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूकदारांच्या ठेवीवर पोस्ट ऑफिस तुम्हाला दरमहा आकर्षक असे व्याज देखील देते. या योजनेमध्ये किमान 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. ही गुंतवणूक तुम्ही सिंगल खाते उघडून किंवा संयुक्त खाते उघडून देखील करू शकता. असे केल्यास तुम्हाला याचा फायदा भविष्यात घेता येऊ शकतो.

मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्ही जर 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 7.4 टक्के व्याज मिळू शकते. तुम्ही जसंयुक्त खाते उघडले तर यामध्ये तुम्ही पंधरा लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही योजना अत्यंत सुरक्षित आणि लाभदायी असल्यामुळे सध्या या योजनेचा अनेकजण फायदा घेताना दिसत आहेत. खास म्हणजे या योजनेत प्री-मॅच्युरिटी पर्याय देखील उपलब्ध आहे. या अंतर्गत तुम्ही पहिल्या वर्षापासूनच आपल्या गुंतवणुकीची रक्कम काढू शकता परंतु त्यासाठी काही अटींचे पालनही करावे लागेल.

महत्वाची बाब गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावी की, ही योजना पोस्ट ऑफिसच्या इतर योजनांपेक्षा वेगळी आहे. या योजनेमध्ये तुम्ही आर्थिक योजनेनुसारच गुंतवणूक करू शकता आणि दर महिन्याला गुंतवणुकीवरील व्याजाचा लाभ घेऊ शकता. परंतु या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेविषयी सर्व माहिती जाणून घ्या.