अखेर 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटली; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडून नियुक्त  १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती हटवली आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यपालांकडून या आमदारांची पुन्हा नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे आता १२ आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात १२ आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावरील सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आमदारांच्या नियुक्त्या करण्याबाबत निर्देश दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना  १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांना दिली होती. मात्र यावर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही.

त्यानंतर अनेक महिने या नियुक्त्या प्रलंबित राहिल्यामुळे राज्यपालांनी काही सुचना आणि बदलांसह ही यादी पुन्हा राज्य सरकारकडे पाठवली. त्यावेळी राज्य सरकारने पुन्हा दुरुस्ती करत ही यादी राज्यपालांना दिली. मात्र तेव्हा देखील याकडे लक्ष देण्यात आले नाही. दरम्यान याच काळात शिंदे सरकार अस्तित्वात आल्याने त्यांनी नविन यादी दिली होती.

यानंतर या यादीसंदर्भात न्यायालयात स्वतंत्र्य याचिका दाखल करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने या सदस्यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवर स्थगिती आणली होती. आज अखेर हीच स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. सप्टेंबर 2022 पासून न्यायालयाने ही स्थगिती कायम ठेवली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून स्थगिती संदर्भात सुरु असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आता या निकालानंतर राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्त्या कधी करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.