Mosquito Repellent Plants : पावसाळा आला, की डासांची ही साथ सुरू होते. शरीराला चावून त्रास देणारे हे डास केवळ झोपमोड करत नाहीत, तर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचाही धोका वाढवतात. बाजारात मिळणाऱ्या रासायनिक मॉस्किटो कॉईल्स, लिक्विड्स आणि स्प्रे यांचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. यावर एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणजे घरात सुगंधित आणि डासांना दूर ठेवणारी झाडं लावणं!
चला तर पाहूया, कोणती आहेत ही ५ नैसर्गिक झाडं, जी डासांपासून घराला नैसर्गिक (Mosquito Repellent Plants) संरक्षण देतात:
१) लव्हेंडर (Lavender)
लव्हेंडरचं सौंदर्य जितकं डोळ्यांना सुखावणारं, तितकंच त्याचा सुगंधही डासांसाठी अतीव त्रासदायक असतो. लव्हेंडरमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलांमुळे डास घरात फिरकत नाहीत. याशिवाय, याचा सुगंध तुमच्या मनालाही शांतता देतो.
२) लेमन ग्रास (Lemongrass)
लेमन ग्रासमध्ये सायट्रोनेला नावाचं नैसर्गिक तेल असतं, जे अनेक मॉस्किटो रिपेलंटमध्ये वापरलं जातं. ही वनस्पती घराच्या गॅलरीत किंवा खिडकीजवळ लावल्यास डास दूर राहतात आणि हवाही सुगंधित होते.
३) तुळस (Tulsi)
भारतीय घरातील परंपरागत झाड म्हणजे तुळस. हिचं धार्मिक महत्त्व जितकं मोठं, तितकंच आरोग्यदायी उपयोग देखील. तुळशीच्या पानांमधून सुटणारा सुगंध डासांना सहन होत नाही. दररोज पाणी घालून तुळस संगोपन केल्यास डासांचा त्रास नक्कीच कमी होतो.
४) पुदिना (Mint)
पुदिन्याचा ताजा वास आपल्याला जितका फ्रेश फील देतो, तितकाच डासांना तो त्रासदायक वाटतो. पुदिन्याचं झाड स्वयंपाकघराच्या जवळ किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यास ते नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट म्हणून काम करतं.
धबधबे, हिरवीगार झाडी, अन डोंगरदऱ्या… ; पावसाळ्यात निसर्गाचा आनंद देणारी 5 पर्यटन स्थळे
५) झेंडू (Marigold)
झेंडूच्या फुलांचा रंग आणि सुगंध दोन्ही डासांना दूर ठेवतात. या झाडांमध्ये pyrethrum नावाचं नैसर्गिक घटक असतो जो अनेक कीटकनाशकांमध्ये वापरला जातो. अंगणात किंवा खिडकीजवळ झेंडू लावल्यास डास प्रवेश करण्याची शक्यता कमी होते. रासायनिक उपायांवर खर्च न करता, हे नैसर्गिक झाडं लावून आपण आपल्या घराचं संरक्षण करू शकतो. हे झाडं डासांसोबतच हवा शुद्ध ठेवण्याचे कामही करतात.




