हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sahara Desert) नजर जाईल तिथपर्यंत दूरवर पसरलेली वाळू, सर्वत्र उष्णतेच्या वाफा, सुकलेली झाडं आणि पाण्याचा एकही थेंब नाही.. ही कल्पनाच घाम काढते ना? असं हे वाळवंटाचं सत्य स्वरूप या जगात अस्थित्वात आहे. ते म्हणजे सहारा वाळवंट. आजपर्यंत निसर्गाच्या किमयेतून उत्पत्ती झालेल्या सुंदर दृश्यांविषयी फार वाचलं असाल, ऐकलं असाल. पण आज आपण याच निसर्गाचा एक भाग असणाऱ्या सहारा वाळवंटाविषयी जाणून घेणार आहोत.
या संपूर्ण जगात असे अनेक देश आहेत जिथे निसर्गाचे सुंदर देखावे पहायला मिळतील. ज्यामध्ये वाळवंटाचा देखील समावेश आहे. वाळवंट म्हणजे एक असे क्षेत्र जिथे वाळूपासून बर्फापर्यंत काहीही आणि कधीही होऊ शकतं. (Sahara Desert) यामध्ये संपूर्ण वर्षात केवळ २५ सेंटीमीटर किंवा ९.८ इंचापेक्षा कमी पाऊस पडतो. इतकेच नाही तर येथील माती अत्यंत कमी सुपीक असते. असे अत्यंत भव्य आणि दूरवर पसरलेले ‘सहारा वाळवंट’ हे उत्तर आफ्रिकेत आहे. जे निसर्गाचे एक वेगळेपण आहे.
जगातील सर्वात मोठे आणि सर्वात उष्ण वाळवंट म्हणून सहारा वाळवंट प्रसिद्ध आहे. य वाळवंटासमोर भारतातील थारचे वाळवंट अगदी लहान वाटते. अशा या भव्य वाळवंटाविषयी काही रहस्यमयी गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
जगविख्यात सहारा वाळवंट (Sahara Desert)
संपूर्ण जगभरातील सर्वाधिक मोठे वाळवंट म्हणून ‘सहारा वाळवंट’ ओळखले जाते. या वाळवंटाला सहारा हे नाव ‘सहरा’ या अरबी शब्दावरून मिळाले आहे. ज्याचा मूळ अर्थ वाळवंट असा आहे. या सहारा वाळवंटाची लांबी ४८०० किलोमीटर आणि रुंदी १८०० किलोमीटर इतकी आहे. या क्षेत्रफळानुसार सहारा वाळवंट हे आपल्या भारताच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट असल्याचे समजते. माहितीनुसार, सहारा वाळवंट हे एकूण १० देशांमध्ये दूरवर पसरलेले आहे.
१० देशांपर्यंत पसरलेले सहारा
सहारा वाळवंट हे अत्यंत भव्य क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. (Sahara Desert) एकूण १० देशांमध्ये हे वाळवंट पसरले असून यामध्ये माली- मोरोक्को, मॉरिटानिया, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, नायजर, चाड, सुदान आणि इजिप्त या देशांचा समावेश आहे. यानुसार सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. केवळ मोठे नव्हे तर हे अत्यंत उष्ण वाळवंट म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
आश्चर्यचकित करणारी बर्फवृष्टी
सहारामध्ये दिवसा तीव्र उष्णता जाणवते. येथे थंडी हा शब्द कुणाच्याच तोंडून ऐकू येणार नाही. मात्र, २०१६ साली एक अशी घटना घडली जिने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. अत्यंत उष्ण अशा या वाळवंटात चक्क बर्फवृष्टी झाली होती. यामागे नेमकं काय कारण आहे? (Sahara Desert) याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला असता त्यांना समजले की, वाळवंटाच्या जवळ असलेल्या ऍटलस पर्वताच्या पायथ्याशी सामान्यपेक्षा १०- १५अंशांनी कमी तापमान झाले होते. ज्यामुळे कमी दाबाचे केंद्र तयार झाले आणि उंचीवरून वारा खालच्या दिशेने येऊन सहारा वाळवंटात बर्फवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
कधीकाळी हिरवेगार होते सहारा पण..
अत्यंत भव्य आणि उष्ण असे हे सहारा वाळवंट २०० मीटर उंचीचे आहे. याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे माउंट कौसी. ज्याची उंची ३४१५ मीटर इतकी आहे. माहितीनुसार, एकेकाळी सहारा हे अत्यंत हिरवेगार क्षेत्र होते. (Sahara Desert) इथे सजीव झाडे, वनस्पती, वन्य प्राणी आणि मानवांचे वास्तव्य होते. मात्र कालांतराने इथे हिरवळ कमी होऊ लागली. हवामान शुष्क होऊ लागले.
हवेतील उष्णता वाढू लागली आणि सुमारे २५०० वर्षांपूर्वी या ठिकाणी जगातील सर्वात मोठे वाळवंट तयार झाले. या ठिकाणी एक मोठे तलाव देखील होते, असेही काही तज्ञांना रिसर्चमध्ये आढळले आहे. पृथ्वीच्या कक्षेत झालेल्या बदलामुळे हवामान बदललं. त्यामुळे हळू-हळू वाळवंट तयार होत गेलं असं म्हटलं जातं. याला ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत असल्याचं रिसर्चमध्ये आढळल आहे.
२०० थडगी आणि मृत सजीवांचे अवशेष
एका वृत्तानुसार, २००५ आणि २००६ साली नॅशनल जिओग्राफिकने एक अहवाल प्रकाशित केला होता. ज्यात सहारा वाळवंटात सुमारे २०० थडग्यांचा शोध लागल्याचे सांगितले होते. यावेळी इथे एक मोठी स्मशानभूमीदेखील आढळून आली. जिथे मानवी हाडे आणि प्राण्यांचे सांगाडे सापडले होते. शिवाय यामध्ये मोठंमोठ्या माशांचे आणि मगरींचे अवशेष देखील सापडल्याची नोंद आहे. (Sahara Desert)