डॉक्टरने मृत बाळात फुंकले ‘प्राण’, काही मिनिटांत घडला चमत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर डॉक्टरांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहिलेच असतील. कधी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतो तर कधी त्यांच्यावर युजर्स भडकतात देखील. अशाच एका डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॉक्टरांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. जर कोणी आपल्याला देव असतो का हा प्रश्न विचारला तर त्यांना हा व्हिडिओ आपण दाखवून देव असण्याचा पुरावा नक्कीच देऊ शकतो. हा व्हिडिओ आहे एका डॉक्टरने (Viral Video) केलेल्या चमत्काराचा.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि बाळाच्या जन्मानंतर (new born baby) ते बाळ काहीही हालचाल करत नाही. त्यानंतर त्या महिला डॉक्टरने या नवजात बाळाला (new born baby) जवळजवळ सात मिनिट सलग सीपीआर दिला त्याला विज्ञानात ‘माउथ टू माउथ रेस्पिरेशन म्हणतात. असे करून या डॉक्टरने त्या बाळाला श्वास घेण्यासाठी मदत केली आहे. त्यानंतर त्या बाळाला पाठीवर चोळतात आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात.अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या बाळाचे प्राण वाचले. शुद्धीत आल्यानंतर हे बाळ हळूच डॉक्टरकडे पाहून हसायला लागले, जे पाहताना खूपच भावनिक आणि मनाला स्पर्श करणारे वाटते.

हा व्हिडिओ सचिन कौशिक यांनी आपल्या ट्विटरवर अकाऊंटवरून शेअर करत सांगितले की, या डॉक्टरचे नाव सुलेखा चौधरी आहे. त्यांच्या या कामामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तर या व्हिडिओवर एका युजरने अतिशय सुंदर कमेंट केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘आम्ही देवाला पाहिले नाहीत परंतु तुम्ही त्यापेक्षाही कमी नाही, कामावरती तुमचे असलेले प्रेम हे इथे स्पष्ट होते खूप छान मॅडम तुमच्या आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.’

हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार