धक्कादायक ! भरधाव ट्रकच्या धडकेत मायलेकरांचा दुर्दैवी अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – वाशीम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील नागपूर – संभाजीनगर या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कारंजा – शेलूबाजार दरम्यानच्या वाई फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेले मायलेक चिरडले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

चंद्रकला करवते आणि वसंत करवते अशी मृत पावलेल्या मायलेकरांची नावे आहेत. हे दोघे शेलू बाजारकडून कारंजाच्या दिशेने जात होते. इतक्यात पुढील बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघेही मायलेक ट्रकखाली चिरडले गेले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्याजवळ शिवशाही बसचा अपघात

पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या उरुळी देवाची इथे शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.