महागाईचा झटका!! ‘या’ कंपनीच्या दूध दरात पुन्हा वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आधीच महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडलं असताना आता मदर डेअरीने (Mother Dairy) आपल्या दूध दारात पुन्हा एकदा वाढ केली आहे. उद्यापासुन ही दरवाढ होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. फुल क्रीम, टोन्ड आणि डबल टोन्ड दुधाच्या (Milk) दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी मदर डेअरीकडून दूध दर वाढवण्याची ही पाचवी वेळ आहे.

या दरवाढीसाठी मदर डेअरीने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदीचा खर्च वाढल्याचे कारण दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाच्या खरेदी खर्चात सुमारे २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या दरानुसार, फुल क्रीमची एक लिटर दुधाची पिशवी आता 64 ऐवजी 66 रुपये असेल. अर्ध्या लिटरच्या पिशवीसाठी ३२ रुपयांऐवजी आता ३३ रुपये मोजावे लागणार आहेत तर टोन्ड दुधाची एक लिटर पिशवी आता ५३ रुपयांना मिळणार आहे. गाईचे दूध आणि टोकन दुधाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

मदर डेअरीने गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्येच दुधाचे दर वाढवले ​​होते. कंपनीने दिल्ली एनसीआरमध्ये फुल क्रीम दुधाच्या दरात प्रति लिटर 1 रुपये आणि म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. मदर डेअरीने यावर्षी दुधाच्या दरात आतापर्यंत तब्बल ५ वेळा वाढ केली आहे. दरम्यान, दुधाच्या दरात वाढ झाल्याने आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे.