इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंनी केला भाजपात प्रवेश, महाराजांबद्दल केलं मोठं विधान; म्हणाल्या की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये जास्त चर्चा झाली ती प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांची होय. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या विजयानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाचीही चांगलीच चर्चा होत आहे. प्रवेशानंतर त्यांनी इंदुरीकर महाराजांबद्दल मोठं विधान केलं आहे.

भाजपा प्रवेशानंतर शशिकला पवार यांनी प्रवेश करण्यामागचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या की, “मी ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. जनतेने भरपूर मतं देत माझ्यावर विश्वास टाकला आणि मी निवडून आले. या निवडणुकीत मी जनतेला काही कामी करण्याची आश्वासने दिली होती. हि कामे करण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला. राजकारण हे माझं श्रेत्र नाही, मी गावाच्या विकासासाठी राजकारणात आले. आम्ही वारकरी आहोत. मी निवडणुकीत उभं राहण्याला इंदुरीकर महाराजांचाही विरोध होता, असे मोठे विधान पवार यांनी केले.

https://www.facebook.com/RVikhePatil/posts/712096956942269

संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावातून इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याचा दावा केला होता. दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने शशिकला पवार यांनी गावातील समस्या सोडवू असा पावित्रा त्यांनी घेतला होता. मात्र, थोरातांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपात प्रवेश केला. महसूलमंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित त्यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती विखे पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.