व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Video : सज्जनगडावर बिबट्याच्या बछड्याला आई भेटली, ट्रम्प कॅमेऱ्यात कैद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
किल्ले सज्जनगड येथे काल दुपारी तीनच्या सुमारास छोट्या बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांची धांदल उडाली होती. त्यानंतर वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वाट चुकलेला बछडा आणि त्यांची आईच्या भेटीचा व्हिडिअो समोर आला आहे. बछड्याला मादी अधिवासात घेवून गेली आहे. सदरची घटना ट्रम्प कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

किल्ले सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही युवक काल दुपारी ३च्या दरम्यान भटकंती करत होते. यावेळी त्यांना अचानक बिबट्याचा बछडा खेळताना दिसला. अचानकच दिसलेल्या बिबट्याच्या बछड्याचे दर्शनाने युवकांची भंबेरी उडाली, युवकांची पावले मागे आली. मात्र, त्या परिसरात बिबट्या नसल्याची खात्री झाल्याने त्यांचे धाडस वाढले. त्या नंतर बछड्याचे फोटो काढले. ही घटना सज्जनगडावर समजताच युवकांची गर्दी वाढली. त्यातील काहींनी ही माहिती तत्काळ वनधिकाऱ्यांना कळविली.

याबाबत तालुका वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. सज्जगडावर बिबट्याचा वावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रात्री 9.30 वाजता मादी आपल्या पिलाला बिलगत कुशीत घेवून अधिवसात गेली.