वाघिण पिल्लांच्या मरण्यानं झाली दुखी, जेवणही सोडलं..मात्र त्यानंतर झाला ‘हा’ चमत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राणी असो वा मनुष्य … आई ती आईच… आपल्या पिल्लांसाठी तिचा जीव तुटणारच… अशीच एक घटना थायलंड मध्ये घडली. थायलंडमधील प्राणीसंग्रहालयात एका वाघिणीने बछड्याला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने ते जास्तवेळ जगू शकले नाही. बछड्याच्या मृत्यूने वाघिणीला धक्का बसला आणि ती उदास झाली, तिने अन्नाचाही त्याग केला आणि जवळजवळ तिची हालचाल सुद्धा थांबवली.

Mother tigress

 

वाघिणीला तिच्या दुःखाचा सामना करण्यासाठी वेळ लागणार हे प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना माहित होते. परंतु वाघिणीने अन्न खाण्यासच नकार दिल्याने बरी होण्याआधीच थकव्यामुळे तिचा मृत्यू होईल अशी भीती त्यांना वाटत होती.

Mother tigress

यासाठी प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांनी एका युक्तीचा वापर केला. त्यांनी डुकराच्या लहान पिल्लाना वाघाच्या रंगाचे सूट शिवले आणि त्यांना त्या दुःखी वाघिणीच्या पिंजऱ्यात ठेवले.

Mother tigress

त्या पिल्लाना पाहून वाघिणीला आश्चर्य वाटले नाही. तिने त्यांना स्वीकारले आणि काळजीने जवळ घेतले. यांनतर आपलीच पिल्ले समजून ती खुश झाली आणि हळूहळू बरी होऊ लागली.