Mother’s Day 2024| आई या शब्दांमध्ये प्रेम, वात्सल्य माया असे विविध भाव दडलेले आहेत. त्यामुळे या आईला आपण परमेश्वराचे दुसरे रूपच मानतो. आई या जगातील अशी व्यक्ती असते जी आपल्या मुलांचे सर्व अपराध पोटात घेत त्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करते. या मुलांसाठीच ती दिवस-रात्र कष्ट करत असते. परंतु एवढे करूनही तिची कुठेही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यासाठी ती या जगात सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी मातृदिन साजरी केला जातो.
मदर्स डे साजरी करण्याचा इतिहास (Mother’s Day 2024)
दरवर्षी जगभरात मोठ्या उत्साहात आनंदात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरी केला जातो. त्यानुसार, यावर्षी भारतामध्ये मदर्स डे 12 मे रोजी साजरी केला जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे. खरे तर, सध्या संपूर्ण जगभरात साजरी केल्या जाणाऱ्या मदर्स डेची स्थापना ॲना जार्विस यांनी 20 व्या शतकाच्या सुरुवातीस केली होती. ज्या आपल्या आईवर जीवापाड प्रेम करत होत्या.
ॲना जार्विसच्या आईचे नाव ॲन रीव्हस जार्विस होते. ॲन रीव्हस जार्विस यांना नऊ मुले होती. ज्यांचा मृत्यू झाला होता. त्या मदर्स डे (Mother’s Day 2024) नावाने एक नेटवर्क चालवायच्या. यामागील उद्देशच बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा होता. यासाठी त्या महिलांना शिकवणी देत असतं. ॲना जार्विस यांना सतत वाटायचे की, जगातील सर्व मातांसाठी एक दिवस असावा. परंतु, हा दिवस पाहण्याअगोदरच 1905 मध्ये त्यांचे निधन झाले. यानंतर आपल्या आईचे हे स्वप्न पूर्ण ॲना जार्विस यांनी पूर्ण केले.
असे म्हटले जाते की, 9 मे 1914 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत केला होता ज्यामध्ये असे लिहिले होते की, मे महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी मदर्स डे (Mother’s Day 2024) साजरा केला जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला मातृदिन साजरी करण्याचा इतिहास काही ठिकाणी वेगळाच सांगितला जातो. असे असले तरी हा दिवस साजरी करण्याचा हेतूच आईविषयी प्रेम व्यक्त करणे हा आहे. जी आई आपल्या मुलांसाठी दिवस रात्र काम करत असते तिच्याविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून मदर्स डेकडे पाहिले जाते. त्यामुळे या मदर्स डेला तुम्ही आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त करा. तुम्ही कायम गृहीत धरलेली आई तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे तिला एक प्रेमळ मिठी मारून सांगा.