Moto E14 मोबाईल कमी पैशात लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त आणि अतिशय कमी पैशात नवीन मोबाईल लाँच केला आहे. Moto E14 असे या मोबाईलचे नाव असून किंमत कमी असली तरी या स्मार्टफोन मध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या मोटोचा हा मोबाईल UK मध्ये लाँच झाला असून येत्या काळात तो भारतीय बाजारात सुद्धा लाँच होण्याची शक्यता आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

6.56-इंचाचा डिस्प्ले –

Moto E14 मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 267 ppi पिक्सेल डेन्सिटी मिळतेय तसेच यामध्ये हाय ब्राइटनेस मोड आणि नाईट मोड देण्यात आलाय. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन मिळतेय. या स्मार्टफोनमध्ये UNISOC T606 प्रोसेसर बसवण्यात आला असून मोटोचा हा मोबाईल Android 14 Go एडिशनवर काम करतो. मोबाईल मध्ये 2GB रॅम और 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलंय, मात्र हीच रॅम वर्चुअल रॅमच्या माध्यमातून 4GB पर्यंत जाते.

कॅमेरा – Moto E14

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Moto E14 मध्ये AI सपोर्टसह 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतोय, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूल 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

मोटोने आपल्या या नव्यास्मार्टफोनची किंमत अतिशय कमी ठेवली आहे. Moto E14 ची किंमत £69.99 (भारतीय चलनानुसार अंदाजे 7,412 रुपये ) आहे. हा स्मार्टफोन ग्रेफाइट ग्रे, पेस्टल ग्रीन आणि पेस्टल पर्पल या रंगात उपलब्ध आहे. मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईट वरून ग्राहक हा मोबाईल खरेदी करू शकतात.